पेस -बॅगमन जोडी विन्सेट सलेम ओपनच्या अंतिम फेरीत

By Admin | Updated: August 27, 2016 20:02 IST2016-08-27T20:02:41+5:302016-08-27T20:02:41+5:30

लिएंडर पेस आणि त्याचा जर्मन साथीदार आंद्रे बॅगमन याच्या साथीने विन्सेट सलेम ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

Paes -bagman pair win in Winns Salem Open final | पेस -बॅगमन जोडी विन्सेट सलेम ओपनच्या अंतिम फेरीत

पेस -बॅगमन जोडी विन्सेट सलेम ओपनच्या अंतिम फेरीत

>- ऑनलाइन लोकमत
विन्सेट सलेम, दि. 27 - लिएंडर पेस आणि त्याचा जर्मन साथीदार आंद्रे बॅगमन याच्या साथीने विन्सेट सलेम ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पेस आणि बॅगमनने पाकिस्तानच्या एसाम उल हक कुरेशी आणि स्विडनच्या रॉबर्ट लिंडस्टेट या जोडीला सुपर टायब्रेकमध्ये १-६,७-६, १०-४ ने पराभूत केले.
 
आता त्याचा सामना स्पेनच्या गुलिरेमो गार्शिया लोपेज आणि फिनलॅण्डच्या हेन्री कोंटिनेन या जोडीशी होईल. या जोडीने क्रोएशियाच्या मॅट पाविच आणि न्युझिलॅण्डच्या मायकेल व्हिनसला ७-६,६-३ ने मात दिली. या सत्रात पेस ७२ व्या स्थानावर घसरला आहे. त्याने चॅलेंजर सर्किटमध्ये बिएला,इटली आणि बुसान, कोरियामध्ये किताब पटकावले आहेत.
 

Web Title: Paes -bagman pair win in Winns Salem Open final