पी. व्ही. सिंधूला जेतेपदाची संधी, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत होणार स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:09 AM2021-03-17T03:09:13+5:302021-03-17T06:58:44+5:30

सिंधूला स्विस ओपनच्या फायनलमध्ये स्पेनची कॅरोलिना मारिनकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तीन वेळेची विश्वचॅम्पियन मारिन जखमी असल्याने ऑल इंग्लंडमध्ये खेळणार नाही.

P. V. Sindhu has a chance to win the title, the tournament will be absent for star players | पी. व्ही. सिंधूला जेतेपदाची संधी, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत होणार स्पर्धा

पी. व्ही. सिंधूला जेतेपदाची संधी, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत होणार स्पर्धा

Next

बर्मिंगहॅम : स्विस ओपनच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून स्टार पी.व्ही. सिंधू बुधवारी सुरू होत असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत जेतेपद मिळविण्याच्या निर्धाराने खेळेल. (P. V. Sindhu has a chance to win the title, the tournament will be absent for star players)

सिंधूला स्विस ओपनच्या फायनलमध्ये स्पेनची कॅरोलिना मारिनकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तीन वेळेची विश्वचॅम्पियन मारिन जखमी असल्याने ऑल इंग्लंडमध्ये खेळणार नाही. याशिवाय चीन, कोरिया व चायनीज तायपेईचे खेळाडूही या स्पर्धेत खेळणार नाहीत.  ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकची पात्रता स्पर्धा नसूनही भारताने १९ सदस्यांचे पथक निवडले आहे.

भारताकडून १९८० ला प्रकाश पदुकोण व त्यानंतर २००१ ला पुल्लेला गोपीचंद यांचा वपवाद वगळता कुणीही ही स्पर्धा जिंकू शकले नाही. सायना नेहवाल हिने २०१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानले होते. सिंधूने २०१८ ला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.  सायना मात्र सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही. मागच्या सामन्यांत ती उपांत्यपूर्व फेरीही गाठू शकली नव्हती. अन्य खेळाडूंमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्त्विक साईराज रंकिरेड्डी, तसेच चिराग शेट्टी यांनी स्विस ओपनमध्ये चांगली कामगिरी केली होती. येथेही त्यांच्याकडून अपेक्षा असतील.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन
पाचवी मानांकित सिंधूचा सलामीचा सामना मलेशियाची सोनिया चियाविरुद्ध होईल. उपांत्यपूर्व लढतीत ती 
जपानची अकाने यामागुचीविरुद्ध खेळू शकेल. सायना सलामीला सातवी मानांकित डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्टविरुद्ध लढेल. 

श्रीकांत, कश्यपवर नजर 
- श्रीकांतला इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तोविरुद्ध खेळायचे आहे. बी. साईप्रणीत फ्रान्सचा तोमा ज्युनिअर पोपोवविरुद्ध खेळेल. 
- पुढच्या फेरीत त्याला व्हिक्टर एक्सलसेनचा सामना करावा लागू शकतो. एक्सलसेनने अलीकडे स्विस व थायलंड स्पर्धा जिंकली. पारुपल्ली कश्यप सलामीला जपानच्या केंटो मोमोताविरुद्ध खेळेल. एच. एस. प्रणय मलेशियाचा डारेन लियूविरुद्ध लढेल.
 

Web Title: P. V. Sindhu has a chance to win the title, the tournament will be absent for star players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.