P. V. Indus in the final | पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, देशाचे लक्ष लागले

पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, देशाचे लक्ष लागले

बासेल: ऑलिम्पिक रौप्य विजेती भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ट हिचा शनिवारी सरळ गेममध्ये पराभव क रीत स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने चौथी मानानकित मियावर ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० अशा फरकाने विजय साजरा करताना जानेवारीत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवाचादेखील हिशेब चुकता केला. माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांत हादेखील शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. सात्त्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरी जोडीनेदेखील अंतिम चार जणांमध्ये स्थान निश्चित केले.

Web Title: P. V. Indus in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.