शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

पी. यू. चित्राने घेतली ‘सुवर्ण’ धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:25 AM

पी.यू. चित्राने बुधवारी येथे आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी १५०० मीटर मध्ये आपले विजेतेपद कायम ठेवत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले.

दोहा : पी.यू. चित्राने बुधवारी येथे आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी १५०० मीटर मध्ये आपले विजेतेपद कायम ठेवत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. दुसरीकडे, अजय कुमार सरोज याने पुरूषांच्या १५०० मीटरमध्ये रौप्य आणि दुतीचंदने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.चित्राने बहारीनची धावपटू टायगेस्ट गाशॉ हिला अंतिम रेषेच्या काही मीटर आधी पिछाडीवर सोडले. खलीफा स्टेडिअममध्ये झालेल्या या थरारक शर्यतीमध्ये चित्राने ४ मिनिट १४.५६ सेकंदांत बाजी मारली. बहरीनच्या टागेस्टने ४.१४.८१ ही वेळ नोंदवत रौप्य, तर मुटल विनफ्रेड यावीने ४.१६.१८ सेकंदासह कांस्य पदक मिळवले.या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. या आधी गोमती एस. (८०० मीटर) व तेजिंदर पाल सिंह (गोळा फेक) यांनी सोमवारी सुवर्ण पदक जिंकले होते. १५०० मीटर शर्यतीत अजयने ३ मिनिट ४३.१८ सेकंदासह रौप्य मिळवले. बहारीनच्या अब्राहम किपचिरचिर रोटिचने (३ मिनिट ४२.८५ सेकंद) सुवर्ण पटकावले. महिलांच्या २०० मीटर शर्यतीत दुती चंदने २३.४५ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक जिंकले.शर्यतीच्या अखेरीस बहारीनच्या धावपटूच्या बाजूला पोहचल्यावर मी थोडी नर्व्हस झाली होती. कारण तीने मला आशियाई स्पर्धेत मागे टाकले होते. मला शेवटच्या टप्प्यात खुपच जास्त मेहनत करावी लागली.- पी. यू. चित्रा