आमच्या बचावात सुधारणा आवश्यक

By Admin | Updated: December 2, 2014 01:39 IST2014-12-02T01:39:35+5:302014-12-02T01:39:35+5:30

देशाच्या पश्चिम भागातून प्रवास करून आता आम्ही उत्तर भागात-भारताच्या राजधानी नवी दिल्लीत आलो आहोत. हिरो इंडियन सुपर लीगमध्ये दोन सामन्यांत जरी व्यवस्थित अंतर

Our defense needs improvement | आमच्या बचावात सुधारणा आवश्यक

आमच्या बचावात सुधारणा आवश्यक

अँटोनियो लोपेझ हबास
देशाच्या पश्चिम भागातून प्रवास करून आता आम्ही उत्तर भागात-भारताच्या राजधानी नवी दिल्लीत आलो आहोत. हिरो इंडियन सुपर लीगमध्ये दोन सामन्यांत जरी व्यवस्थित अंतर असले, तरी ते पटकन संपून जाते. तेव्हा तुम्हाला तुमचे धडे लवकर गिरवावे लागतात.
आमच्या गेल्या पुणे सिटी एफसीच्या सामन्यानंतर आम्हाला जाणवले, की आमच्या बचावात आम्हाला सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण, त्यामुळे आम्हाला आक्रमणाला जास्त पर्याय उपलब्ध होतील. सुटसुटीत बचावाने आत्मविश्वास वाढून बचावापासून आक्रमणाचे डाव रचायला मदत होईल. सध्या फॉर्मात असलेल्या दिल्ली डायनॅमो एफसीविरुद्ध ते आवश्यक आहे.
पुणे सिटी एफसीविरुद्ध आम्ही आमची जिद्द शेवटपर्यंत अबाधित ठेवली, त्याबद्दल दाद द्यायलाच हवी. या सामन्यात आम्ही आमचे उत्तम प्रदर्शन करू शकलो नाही. आमच्या दृष्टीने सामना चांगला नव्हता. तरीही आम्हाला एका गुणाची कमाई करता आली आणि या घडीला तेच महत्त्वाचे आहे. यातूनच आमची वृत्ती आणि पवित्रा दिसून येतो, ज्यावर आमची भिस्त आहे.
दिल्ली डायनॅमो एफसीबद्दल आत्ताच मला काही बोलायचे नाही. तो एक उत्तम संघ आहे आणि कुठल्याही संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा जो फायदा मिळतो, तो त्यांना मिळणार आहे. कुठल्याही सामन्याकरता आम्ही कुणा एका प्रतिस्पर्ध्याच्या ठरावीक खेळाडूविरुद्ध डावपेच रचत नाही. आमच्या संघाची तयारी प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून नसते, तर आमच्या खेळात सुधारणा करून उत्तम कामगिरी कशी करता येईल याचीच असते.
दुर्दैवाने दुखापतींनी आम्हाला हैराण केले आहे. आमच्या वैद्यकीय पथकाकडून काही चांगली बातमी यायची आम्ही वाट पाहत आहोत. काही खेळाडूंची उपलब्धता आम्हाला अजून पर्याय निर्माण करेल आणि कुठच्याही प्रशिक्षकाकरता ते स्वागतार्ह असते. आमच्या तत्त्वज्ञानात डावपेचांवर तडजोड करायला वाव नाही. प्रत्येक सामना हा आम्हाला नवा असतो आणि त्याची तयारीही नव्याने करायची असते. हाच तर फुटबॉलचा खेळ आहे.
सामन्याची पूर्ण नव्वद मिनिटे जास्तीत जास्त ताळमेळ राखायचा आमचा इरादा असतो; पण वास्तवतेचा विचार करता दोन सामन्यांतल्या कमी अंतराने हे दर वेळी शक्य होतेच, असे नाही. तरीही लीगच्या पहिल्या दहा फेऱ्यांत
आम्ही गुणतक्त्याच्या अग्रस्थानी होतो आणि आताही अग्रभागीच राहायची इच्छा आहे. पण, त्याच्याकरता दडपणावर मात करावी लागेल. आमच्यासाठी हा फार महत्त्वाचा सामना आहे.
दिल्लीत आम्हाला थोडा फार पाठिंबा मिळू शकतो, असे मला सांगण्यात आले आहे. आमच्याकरता ती फारच मोठी गोष्ट आहे
आणि आम्ही त्यांना खचितच निराश करणार नाही.(टीसीएम)

Web Title: Our defense needs improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.