आॅस्करचे भवितव्य गुरुवारी ठरणार?

By Admin | Updated: September 10, 2014 02:18 IST2014-09-10T02:18:29+5:302014-09-10T02:18:29+5:30

ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टीरिअस याचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. मॉडेल रिवा स्टिंकॅम्प हिच्या मृत्यूप्रकरणी आॅस्करवर खटला सुरू

Oscars future will be on Thursday? | आॅस्करचे भवितव्य गुरुवारी ठरणार?

आॅस्करचे भवितव्य गुरुवारी ठरणार?

दक्षिण आफ्रिका : ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टीरिअस याचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. मॉडेल रिवा स्टिंकॅम्प हिच्या मृत्यूप्रकरणी आॅस्करवर खटला सुरू असून, त्यावर अंतिम सुनावणी गुरुवारी होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी रिवा हिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आॅस्करच्या घरी सापडला होता. या प्रकरणातील प्रमुख मुद्यांवर टाकलेली ही नजर...
‘व्हेलेन्टाइन डे’च्या आदल्या दिवशी घडलेल्या या प्रकरणात आॅस्करला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ७ एप्रिलला या खटल्याची सुनावणी झाली आणि त्या वेळी आॅस्करने न्यायालयात रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागितली. तो म्हणाला, की मला बोलण्याच्या दिलेल्या संधीचा मी फायदा उचलून प्रथम रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागतो. सकाळी डोळे उघडल्यावर मला तुमचाच विचार येतो. रिवाच्या जाण्याने तुम्हाला किती दु:ख झाले असेल, याचा विचार मी करूच शकत नाही. मी रिवावर प्रेम करत होतो.

रिवाच्या मृतदेहाची छायाचित्रे ज्या वेळी न्यायालयातील मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात आले, त्या वेळी आॅस्करने उलट्या करण्यास सुरुवात केली. पॅथलॉजिस्ट गेर्ट सायमन यांनी रिवावर कशा प्रकारे तीन गोळ्या झाडण्यात आल्या, याचे वर्णन न्यायालयात केले.

या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी रिवाने आॅस्करला पाठवलेला मेसेज २४ मार्च रोजी पोलीस अधिकाऱ्याने वाचला. त्यात रिवाने म्हटले होते की, माझ्या प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट होतोस, त्याची मला कधी कधी भीती वाटते. हे दोघेही एकमेकांना ‘एंजल’ आणि ‘बाबा’ या टोपणनावाने संबोधत होते आणि यांच्यातील ९० टक्के संवाद हा प्रेमाचाच होता.

क्रिकेट बॅट दरवाजावर आदळण्याचा आवाज आणि गोळ्या झाडण्याचा आवाज यात साम्य जाणवत असल्याने खटल्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न आॅस्करच्या वकिलाने केला. त्यांच्या मते रिवा बाथरूममध्ये असताना तेथून ‘वाचवा वाचवा’ अशी हाक ऐकू आली आणि ती ऐकून आॅस्कर तेथे पोहोचला. दरवाजा बंद असल्याने त्याने बाहेरून गोळ्या झाडल्या आणि यात चुकून रिवाचा मृत्यू झाला.

Web Title: Oscars future will be on Thursday?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.