पावसासाठी रेणुका माता मंदिरात यज्ञाचे आयोजन

By Admin | Updated: July 1, 2014 21:43 IST2014-07-01T21:43:33+5:302014-07-01T21:43:33+5:30

बाजारसावंगी- येथील रेणुका माता मंदिरात मंगळवारी पाऊस पडावा यासाठी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी पौरोहित्य डोलारे गुरुजी, बंडू सोनटक्के, प्रभाकर जोशी, स्वप्नील जोशी व धनंजय पाडळकर यांनी केले. प्रथम ग्रामस्थांतर्फे व भजनी मंडळातर्फे भजने झाली. ट्रस्टचे अध्यक्ष भिकनराव घुले, काशीनाथ आबा, अंबादास नलावडे, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर नलावडे, अप्पाराव नलावडे, नामदेव पुंड, यादवराव नलावडे, मट्टू महाराज नलावडे, त्रिंबक अप्पा नलावडे, विश्वनाथ नलावडे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Organize yoga for rain in Renuka Mata Temple | पावसासाठी रेणुका माता मंदिरात यज्ञाचे आयोजन

पावसासाठी रेणुका माता मंदिरात यज्ञाचे आयोजन

जारसावंगी- येथील रेणुका माता मंदिरात मंगळवारी पाऊस पडावा यासाठी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी पौरोहित्य डोलारे गुरुजी, बंडू सोनटक्के, प्रभाकर जोशी, स्वप्नील जोशी व धनंजय पाडळकर यांनी केले. प्रथम ग्रामस्थांतर्फे व भजनी मंडळातर्फे भजने झाली. ट्रस्टचे अध्यक्ष भिकनराव घुले, काशीनाथ आबा, अंबादास नलावडे, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर नलावडे, अप्पाराव नलावडे, नामदेव पुंड, यादवराव नलावडे, मट्टू महाराज नलावडे, त्रिंबक अप्पा नलावडे, विश्वनाथ नलावडे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडी इमारतीचे घाटनांद्र्यात लोकार्पण
घाटनांद्रा- येथील अंगणवाडीच्या कार्यालयाचे लोकार्पण जि.प. सदस्य कौतिकराव मोरे व सरपंच संगीताबाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. अंगणवाडी कार्यालयासाठी जि.प.ने दिलेल्या निधीतून ग्रामपंचायतीने ही इमारत बांधली होती. यावेळी माजी उपसरपंच रघुनाथ मोरे, कमलाबाई बिसेन, रत्नाबाई मोरे, प्रमिला सोनार, उल्का हिवाळे, सरस्वती कापसे, मीरा गोंधळे, मीनाबाई जोशी, फिरोजा पठाण, रुखसान शेख, शांता होळकर, नीलिमा तडवी, अर्चना मोरे, बेबी सुरडकर व इतरांची उपस्थिती होती.
पिरोळा-डोईफोडा योजनेतून पाणी चोरी
बोरगाव बाजार- पिरोळा व डोईफोडा या गावच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून एक इंची पाईपची अवैधरीत्या नळजोडणी करून पिण्याच्या पाण्याचा शेतीसाठी वापर करणार्‍या शेतकर्‍याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हा शेतकरी गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतीसाठी या पाण्याचा वापर करीत आहेत. नजीर करीम पठाण (रा. भराडी) असे या शेतकर्‍याचे नाव आहे.
स.भु. विद्यालयात माजी
विद्यार्थ्यांचा संघ स्थापन
वडोदबाजार- स.भु. शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करण्यात आला. हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी शाळेत बैठक पार पडली. यामध्ये डॉ. सुहास वायकोस यांची माजी विद्यार्थ्यांचा संघ अध्यक्षपदी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक मधुकर बिर्‍हारे यांनी केले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष गणेश पांडे, उपसरपंच पांडुरंग ब्राह्मणे, मधुकर म्हस्के, सुनील तांबट, नरेंद्र दरगड, डॉ.अनिल वाघ, धर्मेंद्र पाटणी, गोविंद पांडे, प्रफुल शिंदे, डॉ. भाऊसाहेब वाघ, सीताराम शेळके, रंगनाथ तुपे, श्रीपाद व्यवहारे, उपमुख्याध्यापक ई.डी. खैरनार, अंगद आडोळे,

Web Title: Organize yoga for rain in Renuka Mata Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.