मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाला रोटेशननुसार मतदानाची संधी
By Admin | Updated: March 23, 2017 00:25 IST2017-03-23T00:25:20+5:302017-03-23T00:25:20+5:30
लोढा समितीच्या शिफारशीनुसार देशाची ‘एक राज्य एक संघटना’ ही संकल्पना अमलात आली.

मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाला रोटेशननुसार मतदानाची संधी
नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशीनुसार देशाची ‘एक राज्य एक संघटना’ ही संकल्पना अमलात आली. त्यानुसार महाराष्ट्रात असलेल्या महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई या क्रिकेट संघटनांना बीसीसीआय आमसभेत रोटेशननुसार मतदानाची संधी मिळणार आहे.
बीसीसीआय संविधानाच्या नियम ३ अ, २ सीनुसार सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यातील एकापेक्षा अधिक संघटना रोटेशननुसार मतदानास पात्र ठरतील. एका वेळी एकच संघटना पूर्णकालीन सदस्यासाठी असलेल्या विश्ोषाधिकाराचा वापर करू शकेल. रोटेशन बीसीसीआयच्या धोरणानुसार असेल.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) कोर्ट आणि लोढा समितीच्या श्फिारशींना अनुकूल संविधानाला अंतिम रूप बहाल केले. त्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात (सौराष्ट्र, बडोदा आणि गुजरात क्रिकेट संघटना) या राज्यातील प्रत्येकी तीन संघटना रोटेशननुसार मतदानाचा हक्क बजावतील. हैदराबाद क्रिकेट संघटना ही तेलंगणा राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
(वृत्तसंस्था)