‘क्लीन स्वीप’ची संधी

By Admin | Updated: July 19, 2015 00:38 IST2015-07-19T00:38:01+5:302015-07-19T00:38:01+5:30

वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप

Opportunity for 'Clean Sweep' | ‘क्लीन स्वीप’ची संधी

‘क्लीन स्वीप’ची संधी

हरारे : वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप करण्याची भारताला संधी राहील.
पहिल्या वन डेत भारताला कडवे आव्हान देणाऱ्या झिम्बाब्वे संघाला नंतरच्या एकाही सामन्यात अपेक्षेनुरूप खेळ करता आला नाही. उद्या घरच्या प्रेक्षकांपुढे सांघिक खेळाचे दर्शन घडवीत दिलासा देणारा विजय नोंदविण्याची अखेरची संधी यजमान संघाला राहू शकेल. भारताला नमवायचे झाल्यास झिम्बाब्वेला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, शिवाय मोक्याच्या क्षणी नांगी टाकता येणार नाही. भारताच्या सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केल्याने चिंता करण्याची गरज नाही. हा दुय्यम दर्जाचा संघ होता, तरीही यजमानांना नमविण्यात अडचण आली नाही. वन डेत मालिकावीर ठरलेला अंबाती रायुडूचे जखमी होणे संघासाठी फारसे त्रासदायी ठरलेले नाही. पर्याय म्हणून आलेल्या मनीष पांडेने पदार्पणातच ७१ धावा ठोकल्या. उद्याच्या सामन्यात भारत आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करेल.

संघ असे...
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टिरक्षक), मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा, संजू सॅमसन आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टिरक्षक), चामू चिभाभा, ग्रीम क्रेमर, नेव्हिल मादजिवा, हॅमिल्टन मस्कद्जा, रिचमंड मुथुमबामी , तिनाशे पनयंगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड त्रिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वालेर आणि सीन विलियम्स.

Web Title: Opportunity for 'Clean Sweep'