बाऊन्सरवरील बंदीला डोनाल्डचा विरोध
By Admin | Updated: December 2, 2014 01:38 IST2014-12-02T01:38:22+5:302014-12-02T01:38:22+5:30
आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या डोक्यावर बाऊन्सर लागल्याने व त्यात त्याचे निधन झाल्यामुळे या चेंडूंवर बंदी घालावी किंवा नाही

बाऊन्सरवरील बंदीला डोनाल्डचा विरोध
जोहान्सबर्ग : आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या डोक्यावर बाऊन्सर लागल्याने व त्यात त्याचे निधन झाल्यामुळे या चेंडूंवर बंदी घालावी किंवा नाही, अशी चर्चा सुरू असताना, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज अॅलन डोनाल्डने बाऊन्सरवर बंदी घालू नये असे म्हटले आहे़ असे केल्यास या खेळातील रोमांचकता संपून जाईल, असेही त्याने म्हटले आहे़
डोनाल्ड पुढे म्हणाला, फिल ह्युजचा बाऊन्सर डोक्याला लागून मृत्यू झाला़ याचे दु:ख आहे़; मात्र क्रिकेटमधून बाऊन्सरवर बंदी घालू नये़ असे केल्यास या खेळाला काहीच अर्थ उरणार नाही़ वेगवान गोलंदाज सीन एबोटने टाकलेला बाऊन्सर ह्युजच्या डोक्याला लागला होता़ त्यानंतर त्याचे निधन झाले़ यानंतर क्रिकेटजगतात खेळाडूंच्या सुरक्षेविषयी चर्चा सुरू आहे़
सन २००१मध्ये एका सामन्यादरम्यान आंद्रे नेलचे दोन बाऊन्सर डोनाल्डला लागले होते़ त्यामुळे डोनाल्डला एक आठवड्यापर्यंत रुग्णालयात राहावे लागले होते़ तसेच १९९६मध्ये डोनाल्डचा एक बाऊन्सर संयुक्त अरब अमिरातचा कर्णधार सुल्तान जरवानीच्या डोक्याला लागला होता़ विशेष म्हणजे या वेळी सुल्तानने हेल्मेट घातले नव्हते़ (वृत्तसंस्था)
> वेगवान प्रतिस्पर्धी खेळाडूंना घाबरवण्यासाठी बाऊन्सरचा उपयोग करतात़ या बाऊन्सरमुळे एखाद्या खेळाडूला इजा व्हावी असे कोणत्याही गोलंदाजाला वाटत नाही़ फलंदाजांनीही आपल्या कौशल्याचा उपयोग करून हा चेंडू खेळून काढावा़ विशेष म्हणजे क्रिकेटजगतात बाऊन्सरला चोख उत्तर देणारे अनेक फलंदाज आहेत.
- अॅलन डोनाल्ड