वन-डेतील बादशाह तेव्हाच कळेल -क्लार्क
By Admin | Updated: September 1, 2014 15:35 IST2014-08-31T22:51:51+5:302014-09-01T15:35:49+5:30
वन-डेतील बादशाह तेव्हाच कळेल -क्लार्क

वन-डेतील बादशाह तेव्हाच कळेल -क्लार्क
सिडनी : सध्या जागतिक क्रमवारीत कोणता संघ अव्वल आहे़ याला काहीच अर्थ नाही़ मात्र, आगामी वन-डे वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांतील खरा बादशाह कोण आहे हे स्पष्ट होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याने व्यक्त केले आहे़
ऑस्ट्रेलिया संघ सध्या जागतिक रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ दुसर्या आणि दक्षिण आफ्रिका संघ तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे़
क्लार्क म्हणाला, आम्हाला झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी वन-डे सिरीजमध्ये मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे़ या लढतीत आफ्रिका संघ विजयी ठरल्यास जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेईल़ मात्र, याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही़ आमचे मुख्य ध्येय हे आगामी वन-डे वर्ल्डकप जिंकणे हे आहे़ यासाठी आम्ही विशेष मेहनत घेत आहोत़
पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार्या वन-डे वर्ल्डकपमध्ये ऑसी संघ पाचव्यांदा किताब आपल्या नावे करण्याच्या इराद्याने उतरणार आहे़ या संघाने सलग तीन वेळा वन-डे वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे़ २०११ मध्ये या संघाला भारताकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते़
क्लार्कने सांगितले की, आगामी वर्ल्डकप घरच्या मैदानावर होत आहे़ त्यामुळे आम्हाला पराभूत करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांना विशेष मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही़ आगामी भारतीय दौर्याबद्दल तो म्हणाला, २०१३ च्या दौर्यात आम्ही भारतावर वर्चस्व गाजवले होते़ यावेळीसुद्धा आम्ही भारतीय संघावर दबदबा राखू़