ओमान - नेदरलँड्स सामना पावसामुळे रद्द
By Admin | Updated: March 11, 2016 23:31 IST2016-03-11T23:31:13+5:302016-03-11T23:31:13+5:30
पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडूचा खेळ न होऊ शकल्याने ओमान विरुध्द नेदरलँड्स यांच्यात होणारा पात्रता फेरी सामना अखेर रद्द करण्यात आला.

ओमान - नेदरलँड्स सामना पावसामुळे रद्द
धरमशाला : पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडूचा खेळ न होऊ शकल्याने ओमान विरुध्द नेदरलँड्स यांच्यात होणारा पात्रता फेरी सामना अखेर रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे हा स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विंजय अत्यावश्यक असलेल्या नेदरलँड्सचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. त्याचवेळी सलामीला आयर्लंडला धूळ चारलेल्या ओमानला मुख्य स्पर्धेत धडक मारण्याची नामी संधी मिळाली आहे.
धरमाशालाच्या एचएसपीसीए स्टेडियमवर खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात नाण्फेक जिंकून ओमानने नेदरलँड्सला प्रथम फलंदाजीची संधी दिली. मात्र, यावेळी पावसाने ‘नाबाद’ खेळी करताना आपलेच वर्चस्व राखले. ‘अ’ गटात सलामीला नेदरलँड्सला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. तर ओमानने धमाकेदार सलामी देताना बलाढ्य आयर्लंडला धक्का दिला. (वृत्तसंस्था)