नवी दिल्ली : युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेला हिने राष्ट्रीय रायफल संघटनेद्वारा निर्धारित केलेल्या कठोर नियमांचा अडथळा पार केल्यानंतर विश्वचषकात कांस्य जिंकले व रियो आॅलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण केली. आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्याने त्याआधी सर्वोत्कृष्ट फॉर्म मिळविण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेती असलेल्या अपूर्वीने विश्वचषकातील १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतासाठी दुसरा कोटा पटकावला. ती म्हणाली, की मी पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळणार असल्याने त्यासाठी सर्वोत्कृष्ट फॉर्म मिळवायचा आहे. आगामी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत आॅलिम्पिकमध्ये वर्चस्व स्थापन करण्याचे लक्ष्य असेल, असेही तिने सांगितले. माझ्या यशात सीनिअर खेळाडू, संघटना आणि आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टचा मोठा वाटा असल्याचा अपूर्वीने आवर्जून उल्लेख केला. (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिकपूर्वी फॉर्ममध्ये यायचे आहे -अपूर्वी
By admin | Updated: April 15, 2015 01:16 IST