Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:15 IST2025-10-22T15:09:08+5:302025-10-22T15:15:09+5:30
नायब सुभेदार रँकसह ते लेफ्टनंट कर्नल!

Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
Olympic Medallist Javelin Thrower Neeraj Chopra Honorary Rank Of Lieutenant Colonel : जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन हंगामात भारताला पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताच्या गोल्डन बॉयला बुधवारी भारतीय लष्करातील मानद लेफ्टिनंट कर्नल पद देण्यात आले. दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत नीरज चोप्राला लष्करातील नवी रँक देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळणारा नीरज चोप्रा हा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नायब सुभेदार रँकसह ते लेफ्टनंट कर्नल!
#WATCH | Delhi | Olympic medallist javelin thrower Neeraj Chopra conferred the honorary rank of Lieutenant Colonel in the Indian Army, in the presence of Defence Minister Rajnath Singh and COAS General Upendra Dwivedi pic.twitter.com/bjLwuvoSLj
— ANI (@ANI) October 22, 2025
‘द गॅझेट ऑफ इंडिया’ (सरकारी माहिती पत्र) नुसार, नीरज चोप्राची ही नियुक्ती १६ एप्रिल पासून प्रभावी झाली. २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह त्याचा लष्करातील प्रवास सुरु झाला होता. २०२० मध्ये पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यावर २०२१ मध्ये नीरज चोप्रा सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती. याशिवाय त्याला उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदकासह सन्मानित करण्यात आले आहे. आता तो लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहचला आहे.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठी संधी हुकली
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यात अपयशी ठरला होता. या स्पर्धेतील गत चॅम्पियन असलेल्या नीरज चोप्राला सलग दोन वेळा जेतेपदासह नवा इतिहास रचण्याची संधी होती. पण यंदाच्या स्पर्धेत ८४.०३ मीटर भाला फेकीसह त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
नीरज चोप्राची खेळाच्या मैदानातील उल्लेखनिय कामगिरी
- टोकियो ऑलिंपिक २०२०-सुवर्णपदक- (पुरुष भालाफेक प्रकारात ८७.५८ मीटर अंतर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकून देणारा भारताचा पहिला ॲथलेटिक्स)
- पॅरिस ऑलिम्पिक २०२४ - रौप्य पदक (सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारा भारताचा पहिला ॲथलेटिक्स )
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ (जकार्ता- ८८.०६ मीटर भाला फेकीसह सुवर्णपदक)
- कॉमनवेल्थ गेम्स २०१८ (गोल्ड कोस्ट) -सुवर्णपदक.
- वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ (यूजीन, अमेरिका)- रौप्यपदक ( या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ॲथलीट)
- वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ (बुडापेस्ट)-सुवर्णपदक ( या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नोंदवणारा पहिला भारतीय.
- डायमंड लीग चॅम्पियन २०२२ -हंगामातील सर्वात सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून विजेता.
- आर्मी गेम्स आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा (२०१७)- सुवर्णपदक.
- ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०१६, पोलंड) — ८६.४८ मीटर फेकसह सुवर्ण पदक
- दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१६)- सुवर्णपदक
नीरज चोप्राला मिळालेले प्रमुख पुरस्कार
- राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार (२०२१) -भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान.
- पद्मश्री (२०२२)- भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान.
- अर्जुन पुरस्कार (२०१८) उत्कृष्ट कामगिरीसाठी.
- परम विशिष्ट सेवा पदक (२०२२) -भारतीय सैन्याकडून विशेष सन्मान.
- भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी (२०२४)