शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 15:33 IST

मनूच्या प्रसिद्धीसोबतच तिच्या लग्नाबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत

Manu Bhaker on Marriage Plans: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहा पदके जिंकली. यात नेमबाज मनू भाकर हिने दोन कांस्य पदके जिंकली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. भारतात परतल्यावर तिचे जंगी स्वागत झाले. तसेच अनेक ब्रँड्सने तिला जाहिरातींच्या ऑफर्स दिल्या. या प्रसिद्धीसोबतच आता तिच्या लव्ह लाइफची आणि लग्नाचीही चर्चा रंगल्याचे दिसून आले. मनू भाकर रविवारी तिच्या गावी गोरिया, झज्जर येथील गोकुलधाम गोशाळेत पोहोचली. यावेळी मीडियाशी बोलताना मनू भाकरने काही प्रश्नांची उत्तरे दिली.

लग्नाच्या प्रश्नावर मनूचे उत्तर

मनू भाकर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार का? या चर्चांना तिनेच पूर्णविराम दिला. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रश्नावर मनू म्हणाली की, मला माझा खेळ खूप आवडतो आणि नंतर मी कोचिंगही करेन. याशिवाय लग्नाबाबतचाही प्रश्न मनूला विचारण्यात आला. प्रश्न ऐकताच आधी ती लाजली, मग लाजली आणि मग मनूने लाजून उत्तर दिले. "या सगळ्यात लग्नाचा प्रश्न कुठून आला... अद्याप याबाबत मी काहीही विचार केलेला नाही. देवाने जे ठरवले असेल तर ते भविष्यात वेळच्या वेळी घडेल. सध्या मी माझ्या करियरवरच लक्ष्य केंद्रित करायचे ठरवले आहे," असे तिने हसतमुखाने उत्तर दिले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहण्याच्या प्रश्नावर मनू म्हणाली की, प्रत्येकजण केवळ सुवर्णपदकासाठीच खेळतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकण्याची आशा होती. कांस्यपदक सुवर्णपदक जिंकण्यासाठी आणखी प्रेरणा देईल. तीन महिने खेळातून ब्रेक घेऊन पुन्हा तयारीला लागणार, असेही तिने सांगितले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४marriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल