शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजीत जलवा दाखवणार, भाजपाच्या या महिला आमदार ऑलिम्पिकसाठी सज्ज, कोण आहेत त्या?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:44 IST

Olympic Games Paris 2024: ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकामध्ये एका महिला आमदाराचाही समावेश आहे. त्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप प्रकारामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला आमदारांचं नाव आहे श्रेयसी सिंह.

आजपासून सुरू होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं ११७ क्रीडापटूंचं पथक सज्ज झालं आहे. हॉकीसह, नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजी यासह इतर खेळांमध्ये पदकांवर मोहोर उमटवण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकामध्ये एका महिला आमदाराचाही समावेश आहे. त्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप प्रकारामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला आमदारांचं नाव आहे श्रेयसी सिंह. बिहारमधील जमुई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसी सिंह या ऑलिम्पिकसाठी  पात्र ठरल्या असून, ३० आणि ३१ जुलै रोजी होणाऱ्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप इव्हेंटमध्ये त्या पदकावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतील. 

श्रेयसी सिंह ह्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या लोकप्रतिनिधी असल्याचं बोललं जात आहेत. याआधी श्रेयसी सिंह यांनी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. तर त्याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक डबल ट्रॅप प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक जिंकलं होतं. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.  

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या श्रेयसी सिंह यांनी २०२० मध्ये झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जमुई मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या विजयी होऊन आमदार बनल्या होत्या.  जमुई जिल्ह्यातील गिद्धौर येथील रहिवासी असलेल्या श्रेयसी सिंह ह्या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह आणि बांकाच्या माजी खासदार पुतुल कुमारी यांच्या कन्या आहेत. दरम्यान, राजकारणात प्रवेश केल्यानंतरही श्रेयसी सिंह यांनी खेळामधील आपली आवड जपली. तसेच त्या आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरल्या आहेत.   

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपाMLAआमदार