Olympic champion found in sex scandal, video leaked on porn website | सेक्स स्कँडलमध्ये सापडला ऑलिम्पिक चॅम्पियन, पोर्न वेबसाईटवर व्हिडीओ झाला लीक

सेक्स स्कँडलमध्ये सापडला ऑलिम्पिक चॅम्पियन, पोर्न वेबसाईटवर व्हिडीओ झाला लीक

मुंबई : तुम्ही समाजात नाव कमावता. पण एकदा तुम्ही नावलौकिक मिळाल्यावर मात्र तुम्हाला ते जपायचे असते. कारण फक्त काही वाईट गोष्टींमुळे तुम्ही कमावलेले नाव एका क्षणात मातीमोल होऊ शकते. अशीच एक गोष्ट घडली आहे ती ऑलिम्पिक चॅम्पियनबरोबर. एका सेक्स स्कँडलमध्ये हा ऑलिम्पिक चॅम्पियन सापडला असून त्याचा व्हिडीओही पोर्न साईटवर लीक झाला आहे.

हे ऑलिम्पिक चॅम्पियन शहराचे महापौरही आहेत. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या ते फार जवळचेही समजले जायचे. पण आता या प्रकरणामुळे त्यांच्या पाठिशी कुणीही उभे राहीलेले नाही. आपल्याला फसवण्यात आल्याचे या ऑलिम्पिक चॅम्पियनने म्हटले असून आता याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

हंगेरीच्या ऑलिम्पिक चॅम्पियन जोल्ट बोकोई यांच्याबाबत ही गोष्ट घडली आहे. जोल्ट यांनी जिम्नॅस्टीकमध्ये 1988 साली सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. राजकारणातही ते यशस्वी ठरले. सध्या ते ग्योर या शहराचे महापौर आहेत. आपल्याला याप्रकरणी फसवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे वृत्त जनसत्ता या वेबसाईटने दिले आहे.

जोल्ट म्हणाले की, " ही सर्व गोष्ट राजकीय सुडबुद्धीने घडवण्यात आले आहे. जे व्हिडीओ लीक झाले आहेत त्यांच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. मी या गोष्टींशी सहमत नाही, त्यामुळे मी महापौरपद सोडणार नाही."

Web Title: Olympic champion found in sex scandal, video leaked on porn website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.