Neeraj Chopra Marriage : गोल्डन बॉयला मिळाली सोनपरी! ऑलिम्पियन चॅम्पियननं गाजावाजा न करता उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 22:02 IST2025-01-19T21:59:25+5:302025-01-19T22:02:44+5:30

गोल्डन बॉय नीरज चोप्रानं उरकलं लग्न; सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिल सरप्राइज

Olympic and world champion Neeraj Chopra Gets Married To Himani Shares Wedding Photos On instagram | Neeraj Chopra Marriage : गोल्डन बॉयला मिळाली सोनपरी! ऑलिम्पियन चॅम्पियननं गाजावाजा न करता उरकलं लग्न

Neeraj Chopra Marriage : गोल्डन बॉयला मिळाली सोनपरी! ऑलिम्पियन चॅम्पियननं गाजावाजा न करता उरकलं लग्न

Olympic and world champion Neeraj Chopra Gets Married To Himani See Pics : भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने नव्या वर्षात लग्नाचा बार उडवून दिलाय. भालाफेकपटू नीरज चोप्रानं कोणताही गाजावाजा न करता थेट लग्नाचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. नीरज चोप्रा याच्या पत्नीचं नाव हिमानी असं आहे. नीरज चोप्रानं रविवारी १९ जानेवारीला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आयुष्यातील खास क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करतोय, या कॅप्शनसह फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांसोबत लग्नाची गोष्ट शेअर केली आहे. 

भालाफेकपटूनं कुणालाही भनक न लागू देता उरकलं लग्न; थेट लग्नाचे फोटो शेअर करत दिली माहिती


आपल्याकडे सेलिब्रिटीचं लग्न होणार ही बातमी फारशी लपवून राहत नाही. पण नीरज चोप्रा याबाबतीत छुपा रुस्तम निघाला. आयुष्यातील खास क्षणाची कुणालाही भनक न लागू देता त्याने थेट लग्नाचे फोटो शेअर करून आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे. नीरज चोप्रानं सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केलीये त्यात त्यानं लिहिलंय की, कुटुंबियांच्या साक्षीनं आयुष्याचा नव्या अध्यायाची सुरुवात केली" या पोस्टमध्ये त्याने पत्नीचे नाव हिमानी असल्याचे मेन्शन केले आहे. ती काय करते? यासंदर्भातील माहिती अजून गुलदस्त्यातच आहे.


नीरजला सातत्याने विचारण्यात आले  लग्नासंदर्भातील प्रश्न, पण...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर नीरज चोप्रा सातत्याने चर्चेत होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदकाची कमाई केली. यशाच्या शिखरावर असताना वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये त्याला लग्नासंदर्भातील प्रश्न विचारला जायचा. पण त्याने यावर प्रतिक्रिया देणं नेहमी टाळलं. कोणताही गाजावाजा न करता त्याने अखेर आपला जोडीदार निवडला आहे. एवढेच नाहीतर मोजक्या आणि मित्र परिवाराच्या साक्षीनं तो लग्नबंधनातही अडकलाय.  

 

Web Title: Olympic and world champion Neeraj Chopra Gets Married To Himani Shares Wedding Photos On instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.