ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. ३१ - जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी अँडी मरे याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये ३ सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले. सहाव्या वेळेस नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावल आहे. नोवाक जोकोविचने अँडी मरेचा ६-१, ७-५, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
जोकोव्हिचने मरेला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २०११, २०१३ व २०१५ मध्ये पराभूत केले होते. तसेच मरेला रॉजर फेडररने २०१० च्या अंतिम लढतीत पराभूत केले होते. जोकोव्हिचने या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर केली आहेत.
जोकोविच ने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज रॉय इमरसन यांच्या सहा ऑस्ट्रेलियिन ओपन जिंकन्याच्या रिकॉर्डची बरेबरी करत आपल्या करियरचा ११वा ग्रैंड स्लैम विजेतेपद
जिंकले आहे.