शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

जोकोविच विम्बल्डन ‘चॅम्पियन’, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 9:26 AM

ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसवर केली मात 

लंडन : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अपेक्षित कामगिरी करताना विक्रमी सातव्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. चार सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असे सहज नमवले.

जबरदस्त संयमी खेळ करताना जोकोविचने आपला दर्जा दाखवताना सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररने सर्वाधिक ८ वेळा विम्बल्डन जेतेपद उंचावले आहेत. जोकोविचने अमेरिकेचा दिग्गज पीट सँप्रास याच्या सात विम्बल्डन जेतेपदांच्या कामगिरीची बरोबरी केली. तसेच, जोकोविचने तब्बल २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले असून, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्यांमध्ये त्याने स्पेनच्या राफेल नदालनंतर (२२) दुसरे स्थान मिळविले. फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या स्थानी आहे. 

उपांत्य सामन्यात नदालने पोटदुखीमुळे माघार घेतल्यानंतर किर्गिओसला पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. जोकोविचविरुद्ध पहिला सेट जिंकून त्याने दिमाखात सुरुवातही केली. मात्र, यानंतर त्याने आपल्याच चुकांमुळे जोकोविचला सामना अक्षरश: बहाल केला. किर्गिओसने तब्बल ३० एस मारत जोकोविचला चांगलेच सतावले. मात्र, जोकोविचनेही मोक्याच्यावेळी १५ एस मारत किर्गिओसला जोरदार प्रत्युत्तर दिले. 

धक्कादायक निकालाची होती अपेक्षासामन्यात सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर किर्गिओसकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती. मात्र, नको त्यावेळी वेडेवाकडे फटके मारण्याची चूक केलेल्या किर्गिओसने मिळवलेली पकड गमावली. यामुळे त्याचे लक्षही विचलित झाले आणि अनेकदा त्याने आपला संयमही गमावल्याचे दिसून आले. दुसरीकडे, जोकोविचने आपला उच्च दर्जा दाखवून देताना कोणताही धोका न पत्करत किर्गिओसला सातत्याने चुका कारण्यास भाग पाडले आणि सलग तीन सेट जिंकून २१वे ग्रँडस्लॅम उंचावले.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद१. राफेल नादाल (स्पेन) : २२२. नोव्हाक जोकोविच (सर्बिया) : २१३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) : २०

सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपद१. रॉजर फेडरर : ८२. नोव्हाक जोकोविच : ७३. पीट सँप्रास (अमेरिका) : ७४. बियोन बोर्ग (स्वीडन) : ५

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचWimbledonविम्बल्डन