शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

Norway Chess: वर्ल्ड चँपियन कार्लसनने शस्त्र टाकले, विश्वनाथन आनंद दुसऱ्यांदा विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 2:13 PM

Norway Chess: विश्वनाथन आनंद यांनी नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चँपियन मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे.

Norway Chess: भारतीय ग्रँडमास्टर आणि बुद्धीबळाचे दिग्गज खेळाडून विश्वनाथन आनंद यांनी परत एकदा वर्ल्ड चँपियन मॅग्नस कार्लसन यांचा पराभव केला आहे. आनंद यांनी नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये क्लासिकल सेक्शनच्या 5व्या राउंडमध्ये विजय मिळवला. आता ते या स्पर्धेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. आनंद यांनी कार्लसनला रोमहर्षक अशा आर्मेगडन (सडन डेथ गेम) मध्ये हरवले. 

50 चालींमध्ये जिंकला गेमयापूर्वी या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेला रेग्युलर मॅच 40 चालींवर ड्रॉ झाला. आर्मेगडनदरम्यान आनंद आपल्या जुन्या शैलीत खेळताना दिसले. त्यांनी अवघ्या 50 चालींमध्ये जगातील नंबर 1 खेळाड असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाची धुळ चारली. आता कार्लसनकडे एकूण 9.5 पॉइंट्स आहेत आणि ते या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.

विश्वनाथन आनंद टॉपवरया विजयासोबत विश्वनाथन आनंद या स्पर्धेत टॉपवर आहेत. आनंद यांच्याकडे 10 पॉइंट्स आहेत. आता या टूर्नामेंटमध्ये 4 राउंड बाकी आहेत. यात बुद्धीबळातील टॉप खेळाडूंचा आमना-सामना होईळ. आनंद यांनी यापूर्वी वँग हाओचा पराभव करुन तिसरा विजय मिळवला होता. हाओपूर्वी त्यांनी फ्रांसच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव आणि बुल्गारियाच्या वेसलिन टोपालवला हरवले होते. 

टॅग्स :Chessबुद्धीबळViswanathan Anandविश्वनाथन आनंद