नॉर्थ ईस्ट युनायटेडचा इंग्लंडच्या कीनीशी करार
By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:39+5:302014-09-12T22:38:39+5:30
गुवाहाटी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) चा नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने इंग्लंडचा स्ट्रायकर जेम्स कीनीच्या रूपाने आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूशी करार केला आह़े 28 वर्षीय या स्ट्रायकरने 2005 च्या इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये हॅरी रेडनॅप यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण केले होत़े हॅरी हे इंग्लंडच्या व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात ज्येष्ठ व्यवस्थापकांपैकी एक आहेत़ कीनी 2007 ते 2013 पर्यंत स्वीडनमध्ये खेळला़ स्वीडनच्या लीगमध्ये स्टार खेळाडू म्हणून त्याची गणना होत होती़

नॉर्थ ईस्ट युनायटेडचा इंग्लंडच्या कीनीशी करार
ग वाहाटी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) चा नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने इंग्लंडचा स्ट्रायकर जेम्स कीनीच्या रूपाने आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूशी करार केला आह़े 28 वर्षीय या स्ट्रायकरने 2005 च्या इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये हॅरी रेडनॅप यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण केले होत़े हॅरी हे इंग्लंडच्या व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात ज्येष्ठ व्यवस्थापकांपैकी एक आहेत़ कीनी 2007 ते 2013 पर्यंत स्वीडनमध्ये खेळला़ स्वीडनच्या लीगमध्ये स्टार खेळाडू म्हणून त्याची गणना होत होती़