शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

नितीन चौधरींनी दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत फडकवला भारताचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 17:53 IST

कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा ११ तास ५८ मिनीटात केली पूर्ण

बुलडाणा: तब्बल ८७ किमीचे अंतर ११ तास ५८ मिनीटात पूर्ण करत बुलडाण्याचा नितीन चौधरी यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे जगातील काही मोजक्या मॅरेथॉन स्पर्धेमधील ही अत्यंत कठीण अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे.विदर्भातून एकमेव नितीन चौधरी यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धा ही १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागत असते. त्यात कठीण अशा या स्पर्धेत निर्धारित वेळेच्या आत त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केल्याने बुलडाण्याचे नाव या स्पर्धेमध्ये कोरल्या गेल आहे. त्यांच्या समवेत मराठवाड्यातील डॉ. घुले यांनी ११ तास ५१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण केले. पुणे येथील अतुल गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चौधरी यांनी या स्पर्धेची तयारी केली होती. विशेष म्हणजे जगभरातून या स्पर्धेमध्ये २१ हजार स्पर्धेक सहभागी झाले होते.दक्षीण आफ्रिकेतील दरबन ते पीटरमिरसबर्ग या दरम्यान ही मॅरेथॉन घेण्यात येते. जागतिकस्तरावर मानाची आणि अत्यंत कठीण अशा स्वरुपाची ही स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये ५० छोट्या, मोठ्या टेकड्या पार कराव्या लागतात. स्पर्धेचे नियम ही कडक असून स्पर्धेत पाच कट आॅफ येतात. यामध्ये दिलेल्या निर्धारित वेळेत ठरावीक अंतर पार करावे लागते. त्यामुळे अनेक स्पर्धक या स्पर्धेदरम्यान मधातच बाद होतात. परंतू व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या नितीन चौधरी यांनी स्पर्धेतील सर्व अडथळे पारकरत ही एक अत्यंत कठीण अशी स्पर्धा पारकेली आहे.जगभरातून २१ हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारतातून १८६ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातल्या त्यात विदर्भातून या स्पर्धेत सहभाग घेणारे नितीन चौधरी हे एकमेव स्पर्धक होते. नऊ जून रोही ही स्पर्धा झाली असून सध्या नितीन चौधरी हे दक्षीण आफ्रिकेतून परतीच्या वाटेवर आहेत.

बुलडाण्याच्या उंचीचाही फायदासमुद्र सपाटीपासून दोन हजार १९० फूट उंचीवर बुलडाणा आहे. त्यामुळे येथे तुलनेने आॅक्सीजनचे प्रमाण कमी असते. परिणामी कमी आॅक्सीनमध्ये अधीक कार्यक्षम राहण्याची येथे जन्मलेल्या मुलांच्या ह्रदयाला सवय झालेली असते. उंचावरील बुलडाणा शहरात राहण्याचा फायदाहीही नितीन चौधरींना यात मिळाला असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. नाही म्हणायला बुलडाणा शहरातील मुले शालेय स्तरावर सातत्याने अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेत विभाग तथा राज्यस्तरापर्यंत पोहोचत असल्याचा जुना इतिहास आहे.

टॅग्स :Indiaभारतbuldhanaबुलडाणा