जपान ओपन फायनलमध्ये निशिकोरी-राओनिक आमने-सामने
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:47+5:302014-10-04T22:55:47+5:30

जपान ओपन फायनलमध्ये निशिकोरी-राओनिक आमने-सामने
>टोकियो : चौथी मानांकित जपानच्या केई निशिकोरीने र्जमनीच्या बिगर मानांकित बेंजामिन बेकरचा पराभव करीत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े आता तिचा सामना तिसरी मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकविरुद्ध होईल़ निशिकोरीने बेकरविरुद्धच्या उपांत्यफेरीच्या लढतीत एक सेटच्या पिछाडीनंतर जोरदार परती करताना 4-6, 6-0, 7-6 ने विजय नोंदवला़ दुसरीकडे अन्य एका उपांत्यफेरीच्या लढतीत राओनिकने एकतर्फी लढतीत फ्रान्सच्या बिगर मानांकित जॉईल्स सिमोनचा सरळ सेटमध्ये 6-1, 6-3 ने पराभव केला़