बोस्नियाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळणार नायजेरिया
By Admin | Updated: June 21, 2014 00:16 IST2014-06-20T21:24:49+5:302014-06-21T00:16:22+5:30
नायजेरियात विश्वचषकाचा सामना पाहणारे २१ चाहत्यांचे बॉम्बस्फोटात निधन झाल्यामुळे या आफ्रिकन संघातील वातावरण दु:खमय झाले आहे;

बोस्नियाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळणार नायजेरिया
पॉइंटर- नायजेरिया जागतिक क्रमवारीत ४४ आणि बोस्निया संघ २१ व्या क्रमांकावर आहे. एफ गटातील हे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आतापर्यंत एकदाही आमने-सामने उभे राहिले नाहीत. इराणला बरोबरीत ठेवणार्या नायजेरियाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी बोस्नियाविरुद्धचा सामना ठरणार महत्त्वाचा. पराभव झाल्यास बोस्नियाला करावे लागणार पॅकअप
कुइयाबा (ब्राझील) : नायजेरियात विश्वचषकाचा सामना पाहणारे २१ चाहत्यांचे बॉम्बस्फोटात निधन झाल्यामुळे या आफ्रिकन संघातील वातावरण दु:खमय झाले आहे; परंतु त्यांचे खेळाडू उद्या येथे बोस्नियात हर्जेगोविनाविरुद्ध होणार्या स्पर्धेत आपली सवार्ेत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध आहेत.
योबेची राजधानी दमातारूयेथे मंगळवारी मोठ्या स्क्रीनवर ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील सामना पाहत असताना तेथे बॉम्बस्फोट झाला होता. संघाचा मीडिया अधिकारी बेन अलाइया यांनी या दु:खद घटनेमुळे खेळाडू आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे सांगितले. बाद फेरीत पोहोचण्यासाठी नायजेरियाला हा विजय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांना याच गटातील उद्या पहिला सामना होणारा अर्जेंटिना आणि इराण यांच्यातील निकालाची माहिती त्यांना असणार असल्यामुळे बाद फेरीत जाण्यासाठी काय करावे लागेल याची व्यूहरचनाही त्यांना आखता येणार आहे.
नायजेरियाने इराणविरुद्ध पहिला सामना गोलरहित ड्रॉ झाला होता. यामुळे त्यांना एक गुण मिळाला आहे. दुसरीकडे बोस्निया पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध २-१ ने पराभूत झाला होता आणि शनिवारी त्यांना पराभव पत्करावा लागल्यास पॅकअप करावे लागणार आहे.
बोस्नियाचे प्रशिक्षक साफेट सुसिक यांनी म्हटले, अर्जेंटिनाविरुद्ध त्यांची व्यूहरचना अपयशी झाली होती; परंतु नायजेरियात ते कोणती कसर बाकी ठेवणार नाहीत. तो खूप महत्त्वाचा सामना नव्हता. पराभव ही फारशी अडचण नाही. अर्जेंटिना उर्वरित दोन्ही सामने जिंकेल. कारण त्यानंतर दुसर्या स्थानासाठी इराण, नायजेरिया आणि बोस्नियात चुरस असेल.
बोस्निया आपल्या आघाडीच्या फळीत काही बदल करू शकतो. बोस्नियाकडून गोल करणारा बेदाद इबीसेव्हिचबरोबर इडेन जेकोदेखील आगामी दोन सामन्यांत आघाडीच्या फळीत असू शकतो. सुसिक म्हणाले, अर्जेंटिनाकडे मधल्या फळीत अनेक आघाडीचे खेळाडू असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध दोन स्ट्रायकर ठेवू शकलो नव्हतो.