न्यूझीलंडचा शानदार विजय
By Admin | Updated: August 1, 2016 05:45 IST2016-08-01T05:45:12+5:302016-08-01T05:45:12+5:30
सीन विलियम्सच्या आकर्षक शतकानंतरही न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा एक डाव आणि ११७ धावांनी पराभव केला.

न्यूझीलंडचा शानदार विजय
बुलावायो : सीन विलियम्सच्या आकर्षक शतकानंतरही न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा एक डाव आणि ११७ धावांनी पराभव केला. विदेशी भूमीवर हा त्यांचा सर्वांत मोठा दुसरा विजय आहे. विलियम्सने ११९ धावांची खेळी केली. कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक ठरले. त्याच्या शतकाने सामन्यात ‘जान’ भरली. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी २९५ धावांवर गारद झाला. त्यांनी पहिल्या डावात १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने ६ बाद ५७६ धावांवर डाव घोषित केला. आता न्यूझीलंड संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेने सकाळी ५ बाद १२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. क्रेग एर्विनने अर्धशतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)