गुप्टिलच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंड विजयी
By Admin | Updated: March 1, 2017 19:50 IST2017-03-01T19:22:22+5:302017-03-01T19:50:02+5:30
मार्टीन गुप्टिलच्या वादळी 180 धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला.

गुप्टिलच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंड विजयी
ऑनलाइन लोकमत
हॅमिल्टन, दि. 1 : मार्टीन गुप्टिलच्या वादळी 180 धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 चेंडू राखून 7 विकेटनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 280 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 45 षटकांत 3 बाद 280 धावा केल्या.
मार्टीन गुप्टिलने वादळी फलंदाजी करताना केवळ 138 चेंडूमध्ये 15 चौकार आमि 11 षटकारासह नाबाद 180 धावांची खेळी केली. त्याला रॉस टेलरने 66 धावा करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकांत 8 बाद 279 धावा केल्या. हाशिम अमलाने 40, डुप्लेसिसने 67 आणि एबी डिव्हिलीयर्सने 70 धावांची खेळी केली.