न्यूझीलंड जेतेपदाचा दावेदार : द्रविड

By Admin | Updated: January 29, 2015 03:05 IST2015-01-29T03:05:49+5:302015-01-29T03:05:49+5:30

१४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये यजमान न्यूझीलंड संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे़

New Zealand winner: Dravid | न्यूझीलंड जेतेपदाचा दावेदार : द्रविड

न्यूझीलंड जेतेपदाचा दावेदार : द्रविड

नवी दिल्ली : १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये यजमान न्यूझीलंड संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे़
द्रविड पुढे म्हणाला, की आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित वन-डे वर्ल्डकपसाठी किवी संघ
मजबूत दिसत आहे़ विशेषत: हा संघ वेगवान गोलंदाजीत उजवा आहे़
त्यांना फलंदाजांची साथ मिळाली,
तर हा संघ जेता ठरू शकतो़ या संघासाठी आणखी जमेची बाजू म्हणजे घरच्या मैदानावर त्यांच्यावर दबाव नसेल़
द्रविड याने पुढे सांगितले, की ब्रँडन मॅक्युलम हा प्रेरणादायी कर्णधार आहे़ दबावात उत्कृष्ट कामगिरी करणे ही बाब प्रत्येक खेळाडूमध्ये आवश्यक आहे़ मॅक्युलम दबावातही उत्कृष्ट खेळ करण्यास सक्षम आहे़ तसेच, केन विलियम्सनने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आपल्या खेळाने
प्रभावित केले आहे़ आगामी वर्ल्डकपमध्येही तो संघाच्या विजयात योगदान देईल, असेही द्रविड
म्हणाला़
टीम साउथी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो़ तसेच डॅनियल व्हिट्टोरीचाही अनुभव संघासाठी कामी येईल़ मात्र, तो वर्ल्डकपसाठी फिट राहतो किंवा नाही, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल, असेही द्रविड याने सांगितले़
(वृत्तसंस्था)

Web Title: New Zealand winner: Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.