न्यूझीलंडने दहा षटकात पार केले श्रीलंकेेचे १४३ धावांचे लक्ष्य
By Admin | Updated: January 10, 2016 12:46 IST2016-01-10T12:37:59+5:302016-01-10T12:46:47+5:30
झीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि कॉलिन मुन्रोच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे १४३ धावांचे लक्ष्य अवघ्या १० षटकात पार केले.

न्यूझीलंडने दहा षटकात पार केले श्रीलंकेेचे १४३ धावांचे लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. १० - न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि कॉलिन मुन्रोच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे १४३ धावांचे लक्ष्य अवघ्या १० षटकात पार केले आणि नऊ गडी राखून मोठया विजयाची नोंद केली. या विजयासह न्यूझीलंडने टी-२० दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली.
कॉलिन मुन्रोने अवघ्या १४ चेंडूत नाबाद ५० धावा फटकावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडतर्फे वेगवान अर्धशतकाचा विक्रम कॉलिन मुन्रोच्या नावावर जमा झाला आहे. आधी मार्टिन गुप्टीलने फटकेबाजी केली. त्याने १९ चेंडूत ५० धावा तडकावल्या. गुप्टील (६३) बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुन्रोने पहिल्या चेंडूपासून फटकावण्यास सुरुवात केली.
मुन्रोने त्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीत एक चौकार आणि सात षटकार लगावले. ग्रँट एलियटच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला वीस षटकात आठ बाद १४२ धावांवर रोखले. श्रीलंकेकडून मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ८१ धावा केल्या. मुन्रोने १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून न्यूझीलंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.