नव्या संघांसाठी ९ नोव्हेंबरनंतर बोली

By admin | Published: October 28, 2015 10:24 PM2015-10-28T22:24:34+5:302015-10-28T22:24:34+5:30

आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी

For the new teams, after November 9, the bid was announced | नव्या संघांसाठी ९ नोव्हेंबरनंतर बोली

नव्या संघांसाठी ९ नोव्हेंबरनंतर बोली

Next

नवी दिल्ली : आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी ९ नोव्हेंबरनंतर बोली लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. बुधवारी शुक्ला आणि ठाकूर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सहा फ्रेंचायझींच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. नोव्हेंबरमध्ये मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यानंतर दोन सत्रांसाठी नव्या संघांसाठी बोली लावण्यात येईल. बैठकीनंतर ठाकूर यांनी समाधन व्यक्त केले. आम्ही २०१६ आणि २०१७ साठी कार्यसमितीच्या शिफारशी सादर केल्या. यावर फ्रेंचायझींनी समाधान व्यक्त केले आहे. आयपीएलसाठी ते सर्व प्रकारचे समर्थन देण्यास तयार झाले आहेत. येत्या सत्रात स्पर्धेत आठ संघ असतील, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)

Web Title: For the new teams, after November 9, the bid was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.