सल्लागार समिती घेणार नव्या प्रशिक्षकाचा शोध

By Admin | Updated: July 6, 2015 01:41 IST2015-07-06T01:41:52+5:302015-07-06T01:41:52+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय)सल्लागार समिती टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहे. सल्लागार समितीपुढे ‘प्रशिक्षकाचा शोध’ हा अजेंडा ठेवण्यात आलेला आहे.

The new coach will be consulted by the advisory committee | सल्लागार समिती घेणार नव्या प्रशिक्षकाचा शोध

सल्लागार समिती घेणार नव्या प्रशिक्षकाचा शोध

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली आणि कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण सदस्य असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय)सल्लागार समिती टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहे. सल्लागार समितीपुढे ‘प्रशिक्षकाचा शोध’ हा अजेंडा ठेवण्यात आलेला आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘सल्लागार समितीची बैठक २९ जुलै रोजी होणार असून त्यात डंकन फ्लेचर यांचा वारसदार शोधण्याचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. या पदासाठी जर आम्हाला योग्य उमेदवार गवसला तर बीसीसीआय सल्लागार समितीसोबत चर्चा करेल.’
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या प्रकृतीबाबत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली. ठाकूर म्हणाले, ‘पद सांभाळण्याच्या पहिल्या दिवसापासून मी आणि दालमिया चांगले काम करीत आहोत. संघटनेच्या कार्यात पारदर्शीता असणे आवश्यक आहे. निवड समितीच्या प्रत्येक बैठकीनंतर आम्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधतो.’
(वृत्तसंस्था)

सल्लागार समितीची पहिली बैठक ६ जून रोजी कोलकतामध्ये झाली होती. आता पुढील बैठक २९ जुलै रोजी होण्याची शक्यता असून त्यासाठी अद्याप स्थळ निश्चित झालेले नाही.’ टॉम मुडी यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याच्या प्रश्नाला गांगुली यांनी मात्र बगल दिली. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार मुडी यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.
- सौरभ गांगुली, माजी भारतीय कर्णधार

मुडी प्रशिक्षकपदासाठी चर्चेत असलेले दुसरे आॅस्ट्रेलियन
च्टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत असलेल्या टॉम मुडी दुसरे आॅस्ट्रेलियन आहेत. मुडी यांच्यापूर्वी जस्टिन लँगर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाण्याची चर्चा होती, आॅस्ट्रेलियाच्या या माजी सलामीवीर फलंदाजाने टीम इंडियापेक्षा वेस्टर्न आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास प्राधान्य दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
च्आता टॉम मुडी यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी
अष्टपैलू खेळाडू मुडी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक आहेत. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. ४९ वर्षीय मुडी यांच्याकडे श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ व वेस्टर्न आॅस्ट्रेलिया या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव आहे. टॉम मुडी यांच्याव्यतिरिक्त झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अ‍ॅण्डी फ्लॉवर यांचेही नाव टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत होते.

Web Title: The new coach will be consulted by the advisory committee