नेदरलँडचे ‘ड्रीम्स एंड’

By Admin | Updated: July 11, 2014 01:04 IST2014-07-11T01:04:19+5:302014-07-11T01:04:19+5:30

अर्जेटिनाने नेदरलँडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव केला आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Netherlands 'Dreams End' | नेदरलँडचे ‘ड्रीम्स एंड’

नेदरलँडचे ‘ड्रीम्स एंड’

अर्जेटिना अंतिम फेरीत : गोलकिपर रोमेरोची चमकदार कामगिरी
साओ पाउलो : गोलकिपर सजिर्यो रोमेरोच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अर्जेटिनाने नेदरलँडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव केला आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत  अर्जेटिनाला आता जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या पराभवाने नेदरलँडच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा ‘दि एंड’ झाला आहे. 
दोन तुल्यबळ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या लढतीत निर्धारित 9क् मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त 3क् मिनिटांच्या खेळात गोलफलक कोराच होता. निकालाची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यात अर्जेटिनातर्फे कर्णधार लियोनेल मेस्सी, इजेकिल गारे, सजिर्यो अगुएरो आणि मॅक्सी रोद्रिगेज यांनी गोल नोंदविले, तर नेदरलँडतर्फे केवळ आर्येन रोबेन व डर्क कुएट यांनाच गोलजाळ्याचा वेध घेता आला. अर्जेटिनाचा गोलकिपर रोमेरो सामन्याचा ‘हीरो’ ठरला. त्याने रान व्लार व व्हेसले स्नायडेर यांच्या फटक्यांवर उत्कृष्ट बचाव केला आणि अर्जेटिना संघाला पाचव्यांदा विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरी गाठून दिली. दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणा:या अर्जेटिना संघाला अंतिम फेरीत तीन वेळा विश्वविजेतेपद पटकाविणा:या जर्मनी संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही बहुप्रतीक्षित लढत रविवारी रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियममध्ये रंगणार आहे. अर्जेटिना संघाने 199क् नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. त्यावेळी डिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील संघाला जर्मनीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. जर्मनी व ब्राझील संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत गोलचा पाऊस अनुभवायला मिळाला असताना दुस:या उपांत्य फेरीच्या लढतीत गोल होण्याच्या मोजक्याच संधी निर्माण झाल्या. दडपणाखाली खेळल्या गेलेल्या या लढतीत उभय संघांनी आपला बचाव अभेद्य राखला. नेदरलँड संघाने मेस्सीला रोखण्यात यश मिळविले. रान व्लारने फिफामध्ये चारदा सवरेत्तम खेळाडूचा मानकरी ठरलेल्या मेस्सीला नैसर्गिक खेळ करण्याची संधी दिली नाही. 
नेदरलँड संघाचा मेस्सी म्हणून ओळखला जाणारा रॉबिन व्ॉन पर्सी निर्धारित 9क् मिनिटे मैदानावर होता; पण अतिरिक्त वेळेच्या सहाव्या मिनिटाला त्याच्या स्थानावर दुस:या खेळाडूला संधी देण्यात आली. पोटाच्या आजारातून सावरण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या पर्सीला सामन्यापूर्वी फिट घोषित करण्यात आले. रोद्रिगो पलासिओला अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या पाच मिनिटांत अर्जेटिनासाठी गोल करण्याची संधी होती; पण त्याने हेडरद्वारे केलेला प्रयत्न थेट नेदरलँडचा गोलकिपर जास्पर सिलेसेनच्या हातात विसावला. मध्यंतरापूर्वी उभय संघांना गोलजाळ्याचा वेध घेण्याची विशेष संधी मिळाली नाही. 2क्व्या मिनिटाला मेस्सीने मारलेल्या फ्री किकवर अर्जेटिनाला संधी होती, पण सिलेसेनने उजव्या बाजूला सूर लगावत अप्रतिम बचाव केला.
 
अर्जेटिनानेदरलँडएकूण
सामन्यातील फाऊल्स1क्1525
यलो कार्ड्स123
गोलसाठी प्रयत्न8715
कॉर्नर448
फ्री किक191433

 

Web Title: Netherlands 'Dreams End'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.