ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:41 AM2021-09-11T11:41:08+5:302021-09-11T12:13:20+5:30

नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

Neeraj Chopra's dream comes true as he takes parents on their first flight | ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता

ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता

Next

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) त्याचं दुसरं स्वप्नही पूर्ण केले. टोक्योत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकण्याचं पहिलं स्वप्न त्यानं पूर्ण केले. ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात १२५ वर्षांत भारताचे अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक ठरले. नीरजच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्याच्यावर कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षावही झाला. ( गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर ) आता नीरजनं त्याचं दुसरं मोठं स्वप्नही पूर्ण केलं अन् त्याबाबत त्यानं स्वतः खुलासा केला आहे.

 T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

नीरज चोप्रानं शनिवारी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. त्यात तो त्याच्या आई-वडिलांसह फ्लाइटमध्ये बसलेला दिसत आहे. त्यावर नीरजनं लिहिलं की,''आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. आई-वडिलांना प्रथमच विमानातून प्रवास घडवतो आहे. तुमचा आशिर्वाद आणि शुभेच्छांचा मी नेहमी कृतज्ञ राहीन.''  
 


नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. या सुवर्णपदकाने त्याचा बाजारमुल्यही वाढला आणि जाहिरातविश्वातून त्याला प्रचंड मागणी होत आहे. नीरज एका जाहिरातीसाठी १ ते ५ कोटी रुपये फी घेतो आणि सध्याच्या घडीला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यानंतर जाहिरातीसाठी सर्वाधिक रक्कम घेणारा दुसरा खेळाडू आहे.   

Web Title: Neeraj Chopra's dream comes true as he takes parents on their first flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app