पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:30 IST2025-09-18T10:30:18+5:302025-09-18T10:30:55+5:30
दोन ऑलिम्पिक पदक विजेता असलेल्या २७ वर्षीय नीरजने पात्रता फेरीत गट अ मध्ये पहिल्याच फेकीमध्ये अंतिम फेरी गाठली. भारताच्या सचिन यादवनेही अंतिम फेरीत प्रवेशककेला.

पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
टोकियो : गतविश्वविजेता नीरज चोप्राने बुधवारी पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८४.५० मीटरची फेक करत थेट जागतिक अजिंक्यपद भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दोन ऑलिम्पिक पदक विजेता असलेल्या २७ वर्षीय नीरजने पात्रता फेरीत गट अ मध्ये पहिल्याच फेकीमध्ये अंतिम फेरी गाठली. भारताच्या सचिन यादवनेही अंतिम फेरीत प्रवेशककेला.
८४.५० मीटरची मर्यादा पार करणारे किंवा सर्वोत्तम कामगिरी करणारे पहिले १२ खेळाडू गुरुवारी अंतिम फेरीत खेळतील. नीरजला ज्याच्याकडून कडवी टक्कर मिळणार त्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८७.२१ मीटरची फेक करत अंतिम फेरी गाठली. भारताचा सचिन यादव ८३.६७ मीटरसह सहाव्या स्थानी राहिला. त्याने एकूण दहावे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली. ब गटात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिसऱ्या फेकीत ८५.२८ मीटर गाठत अंतिम फेरी गाठली. ग्रेनाडाच्या अंडरसन पीटर्सने ८९.५३ मीटरसह अंतिम फेरी निश्चित केली. या गटात भारताच्या रोहित यादवला ७७.८१ मीटरसह १४व्या स्थानी, तर यशवीर सिंगला ७६.२१ मीटरसह १५व्या स्थानी समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत खेळणारे अव्वल १२ भालाफेकपटू
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) ८९.५३
ज्यूलियन वेबर (जर्मनी) ८७.२१
ज्यूलियस येगो (केनिया) ८५.९६
डेव्हिड वेगनर (पोलंड) ८५.६७
अर्शद नदीम (पाकिस्तान) ८५.२८
नीरज चोप्रा (भारत) ८४.८५
कर्टिस थॉम्पसन (अमेरिका) ८४.७२
याकुब वाल्डेच (झे.प्रजासत्तक) ८४.११
केशोर्न वॉल्कॉट (त्रिनिदाद) ८३.९३
सचिन यादव (भारत) ८३.६७
कॅमेरोन मॅकेंटायर (ऑस्ट्रेलिया) ८३.०३
रमेश पथिरागे (श्रीलंका) ८२.८०
ऐतिहासिक कामगिरीचे लक्ष्य
नीरजचे लक्ष्य विश्वविजेतेपद कायम राखण्यावर आहे. असे केल्यास तो अशी कामगिरी करणारा तिसरा पुरुष भालाफेकपटू ठरेल.
नीरजचे सध्याचे प्रशिक्षक झेक प्रजासत्ताकचे जान झेलेझ्नी (१९९३ आणि १९९५) आणि अँडरसन पीटर्स (२०१९ आणि २०२२) यांनीच आतापर्यंत हे यश मिळवले आहे.