नीरज चोप्रा जगात भारी! पाकच्या 'गोल्डन बॉय'ला मागे टाकत ठरला सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:51 IST2025-01-11T10:49:30+5:302025-01-11T10:51:46+5:30
कॅलिफोर्निया येथील 'ट्रॅक अॅन्ड फील्ड न्यूज' २०२४ च्या क्रमवारीत नीरजने अव्वल स्थान पटकाविले.

नीरज चोप्रा जगात भारी! पाकच्या 'गोल्डन बॉय'ला मागे टाकत ठरला सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू
पॅरिस ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्रा याला अमेरिकेतील प्रख्यात 'ट्रॅक अॅन्ड फील्ड न्यूज'ने २०२४ मधील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूचा सन्मान बहाल केला. मागच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम याच्यानंतर २७ वर्षांचा नीरज दुसऱ्या स्थानी राहिला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅलिफोर्निया येथील 'ट्रॅक अॅन्ड फील्ड न्यूज' २०२४ च्या क्रमवारीत नीरजने अव्वल स्थान पटकाविले. त्याने ग्रेनेडाचा दोनवेळेचा विश्व चॅम्पियन अँडरसन पीटर्स याला मागे टाकले. नदीम हा यादीत पाचव्या स्थानावर आला. कारण त्याने ऑलिम्पिकनंतर ज्या डायमंड लीगमध्ये भाग घेतला त्यात तो चौथ्या
स्थानावर होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नदीमने ९२.९७ तर नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक केली. 'ट्रॅक अॅन्ड फील्ड न्यूज' १९४८ पासून काम करीत असून 'क्रीडा क्षेत्राचे बायबल' अशी त्यांची ओळख आहे.
दरवर्षी त्यांची विश्व तसेच अमेरिकन क्रीडा रैंकिंग जाहीर केली जाते. नीरज २०२४ मध्ये डायमंड लीगच्या दोहा, लॉजेन आणि ब्रुसेल्स लेगमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. पावो नाओमी स्पर्धेत त्याने अव्वल स्थान गाठले होते.