गोल्डन बॉय नीरज चोप्रावर तिसऱ्यांदा आली ही वेळ; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आधी वेबरची टेन्शन वाढवणारी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:30 IST2025-08-29T12:30:04+5:302025-08-29T12:30:27+5:30
नीरज चोप्रा ९० पारचा आकडा गाठण्यात संघर्ष करत असताना वेबरनं दोन वेळा केली ही कमाल

गोल्डन बॉय नीरज चोप्रावर तिसऱ्यांदा आली ही वेळ; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आधी वेबरची टेन्शन वाढवणारी कामगिरी
Neeraj Chopra 2nd In Diamond League Final 2025 : डायमंड लीग २०२५ स्पर्धेत नीरज चोप्रानं जोर लावला, पण शेवटी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीच्या जूलियन वेबरनं एकदा नव्हे तर दोन वेळा ९० पार अंतर कापणारा भाला फेकत या स्पर्धेत फायनल बाजी मारली. पहिल्या पाच प्रयत्नानंतर नीरज चोप्रा तिसऱ्या स्थानावर होता. पण अखेरच्या थ्रोसह त्याने दुसऱ्या स्थानावर कब्जा केला. डायमंड लीग स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नीरज चोप्रा ९० पारचा आकडा गाठण्यात संघर्ष करत असताना वेबरनं दोन वेळा केली ही कमाल
World lead for Weber!
— Wanda Diamond League (@Diamond_League) August 28, 2025
Julian Weber wins the javelin with a monster PB of 91.51m.
That's the furthest throw ever at a #DLFinal💎 #ZurichDL🇨🇭 #DiamondLeague
📷 @chiaramontesan2pic.twitter.com/pLHpb6pDa1
डायमंड लीगच्या फायनलमध्ये पहिल्या प्रयत्नातच जूलियन वेबरनं ९१.३७ मीटर अंतरावर भाला फेकला. दुसरीकडे नीरज चोप्राला मात्र पहिल्या प्रयत्नात फक्त ८४.३५ मीटर अंतर कापता आले. नीरजचा दुसरा थ्रो ८२ मीटरवर आला. त्यानंतर तीन प्रयत्न फाउल ठरल्यामुळे नीरज चोप्रासमोर मोठ चॅलेंज उभा राहिले. एका बाजूला नीरज जोर लावण्यात कमी पडत असताना जर्मनीच्या पठ्ठ्यानं दुसऱ्या प्रयत्नात ९१.५७ एवढ्या अंतरावर भाला फेकत अव्वलस्थानावरील आपली दावेदारी आणखी भक्कम केली अन् शेवटी बाजीही मारली. ही त्याची सर्वोत्तम कामगिरीही ठरली.
अखेरच्या प्रयत्नात नीरजनं ऑलिम्पिक चॅम्पिनयला टाकलं मागे
THIS 85.01M THROW BY NEERAJ CHOPRA! 🔥pic.twitter.com/kea72dasJehttps://t.co/df7n9q3ngz
— The Khel India (@TheKhelIndia) August 28, 2025
डायमंड लीग स्पर्धेतील फायलमध्ये अखेरच्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८५.०१ एवढ्या अंतरावर भाला फेकत नंबर दोनवर राहण्याचा डाव साधला. या कामगिरीसह त्याने त्रिनिदाद अँण्ड टॉबेगोच्या २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक विजेत्या केशोर्न वाल्कोट याला मागे टाकले. त्याने ८४.९५ मीटर भाला फेकला. डायमंड लीगमध्ये सलग तिसऱ्यांदा नीरज चोप्रावर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्याची वेळ आली आहे.
वेबरची कामगिरी गोल्डन बॉयला टेन्शन देणारी
डायमंड लीग स्पर्धेत एकदा नव्हे तर दोन वेळा ९० पारचा डाव साधत वेबरनं जेतेपद तर मिळवलेच. पण त्याची ही कामगिरी आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेआधी भारतीय भालाफेकपटूला टेन्शन देणारी अशीच आहे. पुढच्या महिन्यात हे दोन्ही खेळाडू पुन्हा समोरासमोर येतील. त्याला मात द्यायची असेल तर फक्त ९० पारच लक्ष पार करून चालणार नाही तर नीरज चोप्राला आणखी जोर लावावा लागेल.