शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

"मला खूप दु:ख होत आहे...", राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नीरज चोप्रा भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:59 IST

सध्या क्रीडा विश्वात राष्ट्रकुल स्पर्धेचे वादळ वाहू लागले आहे.

Neeraj Chopra Post | नवी दिल्ली : सध्या क्रीडा विश्वात राष्ट्रकुल स्पर्धेचे वादळ वाहू लागले आहे. मात्र भारताला या स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाच एक मोठा झटका बसला. कारण भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या पायाच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) मधून बाहेर झाला आहे. अचानक आलेल्या खळबळजनक बातमीमुळे नीरजच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दरम्यान नीरजने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न झाल्याने मला दु:ख झाले आहे, असे नीरजने पोस्टच्या सुरूवातीला म्हटले. त्याला वर्ल्ड थलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान दुखापत झाली होती. अलीकडेच पार पडलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये नीरजने रौप्य पदक पटकावून भारताचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. तसेच या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात पहिल्यांदाच रौप्य पदक आले आहे. 

नीरजने केली भावनिक पोस्टनीरजने भावनिक पोस्ट करत म्हटले, "अत्यंत दु:खी मनाने तुम्हाला सांगावे लागत आहे की मी यावेळीच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मला वर्ल्ड थलेटिक्स दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्रास जाणवत होता आणि काल इथे अमेरिकेत या दुखापतीची चाचणी केल्यानंतर छोटी दुखापत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे."

"मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. सध्या माझे पूर्ण लक्ष विश्रांतीवर असेल, ज्यामुळे मी लवकरच मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेन. देशवासीयांकडून जेवढे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्यासाठी सर्वांचे आभार मानायचे आहेत." अशा शब्दांत नीरजने समस्त भारतीयांचे आभार मानले. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला होता इतिहासटोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने आपला विजयरथ कायम ठेवत चॅम्पियनशिपमध्ये देखील भरघोस यश मिळवले. २४ जुलै रोजी अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. ८८.१३ मीटर लांब भाला फेकून आपल्या देशाचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. १९ वर्षांपूर्वी अर्थात २००३ मध्ये पहिल्यांदा भारताच्या कोणत्या खेळाडूला चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्यात यश आले होते. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Twitterट्विटरIndiaभारतCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा