नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:28 IST2025-05-14T19:20:59+5:302025-05-14T19:28:13+5:30

नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलीये.

Neeraj Chopra conferred honorary rank of Lieutenant Colonel in Territorial Army | नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास

नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला भारतीय लष्करात बढती मिळाली आहे. टेरिटोरियल आर्मीत त्याला लेफ्टनंट कर्नल ही रँक मिळाली आहे. याआधी तो सुभेदार पदावर होता. भारत सरकारचे अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आणि साप्ताहिक सार्वजनिक पत्रिका असलेल्या 'द गॅझेट ऑफ इंडिया'नुसार, ही नियुक्ती १६ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् नीरज झाला गोल्डन बॉय

नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलीये. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला होता. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. पण रौप्य पदकासह त्याने सलग दुसऱ्यांदा देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकावल्याचे पाहायला मिळाले.
 
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! नीरज चोप्राचा खास प्रवास

२६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह तो आर्मीत जॉईन झाला होता. दोन वर्षांतच  त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये सुभेदार पदावर बढती मिळवण्याआधी त्याला उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले. २०२२ मध्ये भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च शांतताकालीन पदक, परम विशिष्ट सेवा पदक, प्रदान केल्यानंतर त्याला  सुभेदार मेजर पदावर बढती देण्यात आली होती.  

Web Title: Neeraj Chopra conferred honorary rank of Lieutenant Colonel in Territorial Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.