भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएलसह देशात पहिल्यांदा आयोजित करण्यात येणारी 'एनसी क्लासिक' ही भालाफेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ मे पासून ही स्पर्धा खेळवण्यात येणार होती. भारताचा गोल्डन बॉय नीर चोप्रा याने ही स्पर्धा स्थिगित करण्यात आल्याची माहिती देताना एक खास संदेशही दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही संपूर्ण ताकदीनिशी भारतीय सैन्यासोबत आहोत, असा उल्लेख त्याने शेअर केलेल्या निवदाना करण्यात आला आहे.
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा स्थगित
मागच्या महिन्यातच दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजत्या नीरज चोप्रा याने पहिल्यांदाच आयोजित एनसी क्लासिक भालाफेक क्रीडा स्पर्धा बंगळुरुहून पंचकुला येथे स्थलांतरित झाल्याची माहिती दिली होती. आता नीरज चोप्रानं अधिकृत एक्स अकाउंटवरुन आयोजकांकडून प्रसिद्ध कलेल्या निवेदन शेअर केले आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भालाफेक स्पर्धा स्थगित केल्याची माहिती यातून दिली आहे. खेळाडूंसह देशातील परिस्थितीचा व्यापक विचार करून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख यात करण्यात आलाय.
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
आम्ही सर्व देशासोबत
खेळ आणि एकात्मता यावर विश्वास आहे. पण सध्याच्या नाजूक परिस्थितीत देशासोबत उभे राहणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या घडीला देशाच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे असलेल्या सशस्त्र सेना दलाचा विचार महत्त्वाचा आहे. आम्ही सर्व ताकदीनिशी देशासोबत आहोत. जय हिंद. असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. याआधी भारत-पाक यांच्यातील शिगेला पोहचलेल्या तणावानंतर आयपीएल स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.