नीरज चोप्रा ‘कॅप्टन इंडिया’ जागतिक ॲथलेटिक्ससाठी संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:42 AM2023-08-09T05:42:19+5:302023-08-09T05:42:26+5:30

आशियाई विक्रमवीर गोळाफेक खेळाडू तेजिंदरपाल सिंग तूर ग्रोइनच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

Neeraj Chopra 'Captain India' Team Announced for World Athletics | नीरज चोप्रा ‘कॅप्टन इंडिया’ जागतिक ॲथलेटिक्ससाठी संघ जाहीर

नीरज चोप्रा ‘कॅप्टन इंडिया’ जागतिक ॲथलेटिक्ससाठी संघ जाहीर

googlenewsNext

नवी दिल्ली : हंगेरीमध्ये यंदा रंगणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला असून, ऑलिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. भारतीय संघाने आपला २८ खेळाडूंचा चमू जाहीर केला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाची घोषणा भारतीय ॲथलेटिक्स महासंघाऐवजी (एएफआय) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली. 

आशियाई विक्रमवीर गोळाफेक खेळाडू तेजिंदरपाल सिंग तूर ग्रोइनच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. उंच उडी राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्वीन शंकर, ८०० मीटर धावपटू केएम चंदा  २० मीटर चालण्याच्या शर्यतीतील खेळाडू प्रियांका गोस्वामी यांनीही जागतिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

भारतीय ॲथलेटिक्स संघ :
पुरुष : नीरज चोप्रा (भालाफेक-कर्णधार), कृष्ण कुमार (८०० मी.), अजयकुमार सरोज (१५०० मी.), संतोष कुमार तमिलरनसन (४०० मी. अडथळा शर्यत), अविनाश साबळे (३००० मी. स्टीपलचेज), सर्वेश कुशारे (उंच उडी), जेस्विन एल्ड्रिन (लांब उडी), एम. श्रीशंकर (लांब उडी), प्रवीण चित्रावेल (तिहेरी उडी), अब्दुल्ला अबूबाकर (तिहेरी उडी), एल्डोज पॉल (तिहेरी उडी), डीपी मनू (भालाफेक), किशोर कुमार जेना (भालाफेक), आकाशदीप सिंह (२० किमी चालणे), विकास सिंह (२० किमी चालणे), परमजित सिंह (२० किमी चालणे), राम बाबू (३५ किमी चालणे), अमोज जैकब, मुहम्मद अजमल, मोहम्मद अनस, राजेश रमेश, अनिल राजलिंगम आणि मिजो चाको कुरियन (४ बाय ४०० मी. रिले)
महिला : ज्योती याराजी (१०० मी. अडथळा), पारुल चौधरी (३०० मी. स्टीपलचेज), शैली सिंग (लांब उडी), अन्नू रानी (भालाफेक), भावना जाट(चालणे).

Web Title: Neeraj Chopra 'Captain India' Team Announced for World Athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.