ब्राझिल पात्रतेच्या जवळ
By Admin | Updated: March 24, 2017 23:44 IST2017-03-24T23:44:47+5:302017-03-24T23:44:47+5:30
ब्राझिलने उरुग्वेला पराभूत करून विश्वचषक फुटबॉलमध्ये आपली जागा पक्की करण्याच्या जवळ पोहचला आहे.

ब्राझिल पात्रतेच्या जवळ
मोंटेविडिओ : ब्राझिलने उरुग्वेला पराभूत करून विश्वचषक फुटबॉलमध्ये आपली जागा पक्की करण्याच्या जवळ पोहचला आहे. तर मेस्सीच्या एका गोलमुळे अर्जेंटिनाने चिलीवर विजय मिळवत आपल्या पात्रता मिळवण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
चीनमध्ये राहणाऱ्या मिडफिल्डर पालिन्होची हॅट्ट्रिक आणि नेमारच्या गोलच्या मदतीने ब्राझिलने मोंटेविडियोमध्ये उरुग्वेवर ४ -१ असा विजय मिळवला. पाच वेळच्या विश्वविजेत्या संघाने पुढच्या वर्षी रशियात होणाऱ्या विश्वचषकासाठी जवळपास आपले स्थान निश्चित केले आहे.
दुसरीकडे ब्युनासआयर्र्नमध्ये मेस्सीने महत्त्वाच्या वेळी गोल करत अर्जेंटिनाला चिलीवर १ -० ने विजय मिळवून दिला. मेस्सीने १६ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. या विजयाने अर्जेंटिना १३ सामन्यात २२ गुण झाले.अर्जेंटिना दहा संघात तिसऱ्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)