कुस्ती क्रमवारीत नवज्योत कौर दुसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 19:14 IST2018-03-13T19:14:22+5:302018-03-13T19:14:22+5:30
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या क्रमवारीतील 65 किलो वजनी गटाच्या महिलांच्या विभागात नवज्योतने दुसरे स्थान मिळवले आहे.

कुस्ती क्रमवारीत नवज्योत कौर दुसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या नवज्योत कौरने कुस्ती क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या क्रमवारीतील 65 किलो वजनी गटाच्या महिलांच्या विभागात नवज्योतने दुसरे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत फिनलँडची युरोपियन चॅम्पियन पेत्रा ओली अव्वल स्थानावर विराजमान आहे.
प्रो रेसलिंगच्या लीगच्या पहिल्या मोसमामध्ये नवज्योत बेंगळुरु योद्धा संघाकडून खेळली होती. या क्रमवारीत या लीगमधील एकूण 9 खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या विनेशने या क्रमवारीतील 50 किलो वजमी गटात दुसरे स्थान पटकावले आहे. विनेश लीगच्या पहिल्या मोसमात दिल्ली वीर संघाकडून खेळली होती आणि आता तिसऱ्या मोसममध्ये युपी-दंगल संघाटी मुख्य खेळाडू आहे.
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक 62 किलो वजनी गटामध्ये चौथ्या स्थानावर आहे. लीगमध्ये मुंबई महारथी संघाची ती प्रतिनिधीत्व करणार आहे. 65 किलो वजनी गटामध्ये बजरंग पुनियाने चौथे स्थान मिळवले आहे.