नवेली देशमुखला राज्य युवा पुरस्कार
By Admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:23+5:302014-08-22T23:32:23+5:30
औरंगाबाद : राज्य सरकारने शुक्रवारी राज्य युवा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात ८ युवक, ४ युवती आणि ८ संस्थांचा समावेश आहे. युवकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१३-१४ चे हे पुरस्कार जाहीर केले. यात औरंगाबादच्या नवेली देशमुख हिची औरंगाबाद विभागातून युवती आणि तत्त्वशील कांबळे याची युवक राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संस्था म्हणून जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा येथील स्व. जमुनाबाई बहु. सेवाभावी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी अभिनंदन केले आहे.

नवेली देशमुखला राज्य युवा पुरस्कार
औ ंगाबाद : राज्य सरकारने शुक्रवारी राज्य युवा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात ८ युवक, ४ युवती आणि ८ संस्थांचा समावेश आहे. युवकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१३-१४ चे हे पुरस्कार जाहीर केले. यात औरंगाबादच्या नवेली देशमुख हिची औरंगाबाद विभागातून युवती आणि तत्त्वशील कांबळे याची युवक राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संस्था म्हणून जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा येथील स्व. जमुनाबाई बहु. सेवाभावी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी अभिनंदन केले आहे.