‘नकोसा’ युवी आयपीएलला हवाहवासा!

By Admin | Updated: February 17, 2015 02:44 IST2015-02-17T02:44:27+5:302015-02-17T02:44:27+5:30

स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करूनही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला ‘नकोसा’ झालेला युवराज सिंग इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अजूनही हवाहवासा आहे.

'Nausea' UV to IPL! | ‘नकोसा’ युवी आयपीएलला हवाहवासा!

‘नकोसा’ युवी आयपीएलला हवाहवासा!

फॉर्मची घेतली दखल : १६ कोटी रुपयांत दिल्लीने घेतले विकत
बंगळुरू : स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करूनही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला ‘नकोसा’ झालेला युवराज सिंग इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अजूनही हवाहवासा आहे. सोमवारी पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात युवीसाठी दिल्ली डेअर डेव्हिल्सने १६ कोटी रुपये मोजले. आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात युवी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
चार संघांमध्ये चढाओढ
दोन कोटी बेस प्राइज असलेल्या युवीला संघात घेण्यासाठी दिल्लीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळाले. युवीसाठी राजस्थान आणि पंजाब यांनी बोली लावली होती, परंतु सात कोटींच्या वर किंमत गेल्याबरोबर या संघांनी माघार घेतली.

कर्स्टनसोबत खेळण्याचा आनंद
भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबत खेळण्याची संधी पुन्हा मिळाल्याचा आनंद होत आहे. लिलावावेळी झोपलो होतो. माझ्या घरी काही पाहुणे आले आणि त्यांनी याबाबत मला सांगितले. कर्स्टन यांच्यासोबत खेळण्याचा योग पुन्हा जुळून आला. - युवराज सिंग

हव्या असलेल्या खेळाडूसाठी मोठ्यात मोठी किंमत मोजण्याची आमची तयारी होती. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत युवीला संघात सहभागी करून घ्यायचे होते.
- गॅरी कर्स्टन, दिल्लीचे प्रशिक्षक

एकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेला फिरकीपटू केसी चारिअप्पा याला २.४० कोटी रुपयांत विकत घेऊन कोलकाता नाइट रायडर्सने सर्वांना अचंबित केले.

16 कोटी
युवराज सिंग (दिल्ली)
10.5 कोटी
दिनेश कार्तिक (बंगळुरू)
07 कोटी
अँजेलो मॅथ्युज (दिल्ली)
04 कोटी
झहीर खान (दिल्ली)
03.8 कोटी
ट्रेंट बोल्ट (हैदराबाद)
03.5 कोटी
अमित मिश्रा (दिल्ली)

Web Title: 'Nausea' UV to IPL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.