शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:14 IST

या यादीत एकाही क्रिकेटरचा सामावेश नाही

भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, युवा विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी नावे सुचवण्यात आली आहेत. पुरस्कार निवड समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

प्रथमच योगासन खेळाडू आरती पाल हिची अर्जुन पुरस्कारासाठी

भारतीय हॉकी संघातील स्टार आणि मध्यरक्षक हार्दिक हा टोकियो ऑलिम्पिक २०२१ आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. यावर्षी आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाकडून औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षानी प्रथमच योगासन खेळाडू आरती पाल हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. आरती राष्ट्रीय व आशियाई चॅम्पियन असून, आशियाई स्पर्धेत योगासन प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट होणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या यादीत एकाही क्रिकेटरचा सामावेश नाही निवड समितीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट व माजी हॉकीपटू एम. एम. सोमाया यांचाही समावेश आहे. दिव्या देशमुख ही विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. बुद्धिबळपटू विदित गुजराती आणि डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांचीही शिफारस झाली आहे. तेजस्विनने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही दुसरे स्थान मिळवले होते. दोन वेळा विश्व अजिंक्यपद कांस्य विजेती रायफल नेमबाज मेहुली घोष, जिम्नॅस्ट प्रणती नायक, तसेच भारताची क्रमांक एक महिला बॅडमिंटन जोडी त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचीही नावे या शिफारशीत आहेत. विशेष म्हणजे, या यादीत कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश नाही.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: हार्दिक सिंग (हॉकी)

अर्जुन पुरस्कार : तेजस्विन शंकर, प्रियांका (दोघेही अ‍ॅथलेटिक्स), नरेंद्र (मुष्टियुद्ध), विदित गुजराती, दिव्या देशमुख (दोघेही बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (मूकबधिर नेमबाजी), प्रणती नायक (जिम्नॅस्टिक्स), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), निर्मला भाटी (खो-खो), रुद्रांक्ष खंडेलवाल (पॅरा नेमबाजी), एकता भयान (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), पद्मनाभ सिंग (पोलो), अरविंद सिंग (नौकायन), अखिल श्योराण (नेमबाजी), मेहुली घोष (नेमबाजी), सुतीर्था मुखर्जी (टेबल टेनिस), सोनम मलिक (कुस्ती), आरती पाल (योगासन), त्रिसा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेम्सियामी (हॉकी), मोहम्मद अफजल (अ‍ॅथलेटिक्स), पूजा (कबड्डी).

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik nominated for 'Khel Ratna'; 24 for 'Arjuna Award'.

Web Summary : Hardik Singh is recommended for Khel Ratna. Divya Deshmukh, Tejaswin Shankar, and 22 others are nominated for Arjuna Award. Yogasan player Aarti Pal is also nominated. The list excludes cricketers.
टॅग्स :HockeyहॉकीChessबुद्धीबळ