राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सन्मान

By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:20+5:302014-08-29T23:33:20+5:30

नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांतील नाशिकमधील पन्नासहून अधिक युवा क्रीडापटूंचा सत्कार येथील क्रीडासाधना संघटनेच्या वतीने करण्यात आला.

National players were honored | राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सन्मान

राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सन्मान

शिक : राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांतील नाशिकमधील पन्नासहून अधिक युवा क्रीडापटूंचा सत्कार येथील क्रीडासाधना संघटनेच्या वतीने करण्यात आला.
कालिका मंदिर सभागृहात या क्रीडा पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी नाशिकमधील उगवत्या क्रीडापटूंचे कौतुक करतानाच, खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास एक दिवस नाशिकनगरी क्रीडानगरी झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार काढले. यावेळी व्हॉलीबॉल, जम्परोप, टेनिस, बॅडमिंटन, तलवारबाजी आदि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रकारातील ५० हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या क्रीडा प्रकारातील मार्गदर्शक राजू शिंदे, शशांक वझे, विक्रम दुधारे, किरण घोलप, मकरंद देव आदिंचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केशव पाटील, दत्ता पाटील, सुभाष तळाजिया यांच्यासह क्रीडासाधना संघटनेचे अशोक दुधारे, आनंद खरे, रमेश मारवाडी, अविनाश खैरनार आदि उपस्थित होते. अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: National players were honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.