महाराष्ट्राच्या पुरुष संघाने “६७व्या वरिष्ठ पुरुष/महिला राष्ट्रीय स्पर्धेत” विजयी सलामी दिली. जयपूर राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने पूर्णिमा विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने जम्मू-काष्मीरचा ४७-२४ असा पराभव करीत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला. शुभम शिंदे, रोहित बने यांचा भक्कम बचाव, तर पंकज मोहिते, अजिंक्य पवार यांच्या पल्लेदार चढाया या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. पुरुषांच्या ड गटात बिगर नामांकन असलेल्या तामिळनाडूने चौथा नामांकन असलेल्या हरयाणाला ३७-३१ असे पराभूत करीत खळबळ उडवून दिली.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाला तिसरे नामांकन मिळाल्यामुळे त्यांचा क गटात समावेश आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू आणि कष्मीर हे अन्य तीन संघ त्यांच्या बरोबर या गटात आहेत. हिमाचल वगळता अन्य दोन संघ तसे दुबळे वाटतात. महिलांचा साखळी सामन्यापासूनचा प्रवासच खडतर आहे. त्यांचा अ गटात समावेश असून गटविजेते रेल्वे व तामिळनाडू हे अन्य दोन संघ या गटात आहेत. महाराष्ट्राची तामिळनाडूशी होणारी लढत ही त्यांचे अस्थित्व दाखवून देईल.
Web Title: National Kabaddi: Maharashtra won opening match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.