शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 9:20 PM

महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.

रोहा : महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये  ५  आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये   ५ गुण पटकावले.

 

महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी " ६६व्या पुरुष वरिष्ठ गट" राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.  रायगड रोहा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.

रिशांकने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण करीत महाराष्ट्राच्या गुणांचे खाते खोलले. ८व्या मिनिटाला तुषार पाटीलने शिलकी ४ गडी एकाच चढाईत टिपत केरळवर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. पुन्हा जोरदार आक्रमण करीत दुसरा लोण देत आणला होता, पण केरळच्या शिलकी एक खेळाडूने बोनससह दोन गडी टिपत व निलेश साळुंखेची अव्वल पकड करीत होणारा लोण केरळने लांबविला. मध्यांतराला २४-१२अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यांतरानंतर ३ऱ्या मिनिटाला दुसरा लोण देत महाराष्ट्राने २९-१३अशी आघाडी घेतली. तिसरा लोण देताना पुन्हा एकदा तुषारने ६व्या मिनिटाला ४गडी टिपले तर शिलकी दोन गडी रिशांकने टिपत ७व्या मिनिटाला लोण देत ४२-१८ अशी आघाडी वाढविली. यानंतर तुषारला विश्रांती देण्यात आली. पण मध्यांतरा नंतर ११व्या मिनिटाला एका  लोणची परतफेड करीत केरळ ने ३०-४५अशी आघाडी कमी केली. पुन्हा एकदा महाराष्ट्राने जोरदार कमबॅक करीत १६ गुणांनी सामना खिशात टाकला.महाराष्ट्राकडून तुषार पाटील ७चढाया करीत १०गुण मिळविले. अजिंक्य पवारने ८ चढायात ८गुण घेतले. रिशांकने देखील चढायात गुण घेतले. विशाल माने व विकास काळे यांनी ४-४पकडी घेत आपली भूमिका पार पाडली. केरळ कडून जिष्णु के के यांनी ८ चढायात २ बोनस व ६ गडी टिपले. सागर कृष्णाने ४ पकडी करीत चांगला प्रतिकार केला.दुसऱ्या सामन्यात बिहारने राजस्थानचा प्रतिकार ४५-४४असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला २३-१९अशी आघाडी बिहारकडे होती. बिहार कडून नवीनने ३४ चढाया करताना ३बोनस सह १९ गुण मिळवीत या विजयात म्हत्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून सचिनने १७ चढायात ३ बोनस व १२गुण घेत चांगला प्रतिकार केला.  इतर सामन्यात कर्नाटकने पोंडेचरिला ६४-२२असे, तर भारतीय रेल्वेने दिल्लीला ५६- ३१असे नमवित आगेकूच केली.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र