राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत नाशिक संघाला सुवर्णपदक एचपीटी-आरवायके संघाची उत्कृष्ट कामगिरी
By Admin | Updated: October 10, 2015 22:13 IST2015-10-10T18:03:02+5:302015-10-10T22:13:14+5:30
नाशिक : क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बास्केट बॉल क्रीडा स्पर्धेचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४, १७, १९ वर्ष वयोगटांतील मुले आणि मुली यांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत नाशिक संघासह मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद, पुणे येथील संघ सुद्धा सहभागी झाले होते.

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत नाशिक संघाला सुवर्णपदक एचपीटी-आरवायके संघाची उत्कृष्ट कामगिरी
नाशिक : क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बास्केट बॉल क्रीडा स्पर्धेचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४, १७, १९ वर्ष वयोगटांतील मुले आणि मुली यांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत नाशिक संघासह मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद, पुणे येथील संघ सुद्धा सहभागी झाले होते.
या स्पर्धेअंतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटीतील एच.पी.टी आणि आर.वाय.के महाविद्यालयातील मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटात सुवर्णपदक मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये नाशिक विभागाने अमरावती विभागाचा ७९ - ३० या फरकाने पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला, तर उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाचा ७९-४९ अशा फरकाने पराभव करत अंतिम सामन्यात नागपूर विभागाचा ७३-४९ अशा फरकाने पराभव करून अंतिम सामन्यात विजय मिळवुन सुवर्णपदक प्राप्त केले.
नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत आदित्य अष्टेकर, मोहित पोकार, मनिंदर सिंग, आशिष कांबळे, अथर्व डरंगे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेतील विजयामुळे नाशिक संघाची दिल्ली येथे होणार्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार आहे.
इन्फो : (चौकट करणे)
दिल्ली येथे होणार्या स्पर्धेसाठी संघ
आदित्य अष्टेकर (कर्णधार), मोहित पोकार, मनिंदर सिंग, आशिष कांबळे, अथर्व डरंगे, चिन्मय टिळे, आनंद काळे, इंद्रेशन मौर्या, प्रांशु टोपले, दिव्य पोकार, साहिल हुसले, राहुल अहेर.
फोटो :पीएच ०९ ओटी ०२ नावाने सेव्ह आहे.
कॅप्शन : नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बास्केट बॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या संघासमवेत प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य व्ही. डब्ल्यू. उगले, राजेश क्षत्रिय, क्रीडा परीक्षक राजेंद्र तेलुरे, सुरेश कोकाटे, सुरेश शर्मा आदि.