्न्नगुरुदास राऊत उपकर्णधार
By Admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:02+5:302014-06-20T21:25:02+5:30
अपंग क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरा

्न्नगुरुदास राऊत उपकर्णधार
अ ंग क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरागुरुदास राऊत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदीनागपूर: आगामी २९ जून ते ६ जुलै या कालावधीत भारतीय अपंग क्रिकेट संघ द. आफ्रिकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात नागपूरचा गुरुदास राऊत हा भारतीय संघाचा उपकर्णधार राहील. एकूण सहा टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात विदर्भातून गुरुदासशिवाय सारंग चाफले याचा समावेश आहे. ठाण्याचा रवी पाटील हा संघाचे नेतृत्व करणार आहे. या आधी पाक दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व गुरुदासने केले होते. भारताने पाकचा ३-० ने पराभव केला होता. राष्ट्रीय स्पर्धेत पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद गुरुदासने भूषविले हे उल्लेेखनीय. दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे तयारी शिबिर मुंबईतील विरार येथे सुरू झाले आहे.द. आफ्रिका दौरा करणारा भारतीय संघ असा:रवी पाटील कर्णधार, गुरुदास राऊत उपकर्णधार, सारंग चाफले, राजेश सुर्वे, रवींद्र संते, इक्बाल खान, अब्दुल खालिक, तुषार पॉल, विजयकांत तिवारी, अजय यादव, यशपाल शर्मा, संदीप सेन, अनिल कुमार, विनोद कुमार, आर. रेड्डी, नवीन कोकचा (फिजियो), उत्पल मुजुमदार (कोच), हरप्रितसिंग (व्यवस्थापक), अधिकारी: रवी चौहान आणि सुरिंंदर लोहिया.(क्रीडा प्रतिनिधी).........................................................